साई मंदीराचा ९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ :  येथील साई नगरात उभारण्यात आलेल्या साई मंदीराचा ९वा वर्धापन दिन श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर उत्साहात पार पडला. श्री साई समितीच्या वतीने वर्धापन दिन उत्सव सोहळ्या निमित्त दि. १० ते २६ एप्रिल या कालावधीत पार पडणाऱ्या साई चारित्र पारायण उपक्रमात परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले.

श्री राम नवमी दिनी सकाळी श्रींचा अभिषेक तर सायंकाळी राहूरी तालुक्यातील कात्रडच्या कृष्णाई मुलीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या हभप तेजस्विनी महाराज नवले यांचे साई चरित्र पर कीर्तन झाले.

यावेळी असंख्य युवक ‘युवतींनी नवले महाराज यांच्या हस्ते तुळशी माळ घालून सत् मार्गाने जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेतली. महाप्रसादाने उत्सवाची सांगाला झाली. संध्याकाळी प्रभात फेरी परिवाराच्या वतीने सामुहिक हनुमान चालीसा पठण व संगित भजन हा उपक्रम पार पडला.