शेवगाव प्रतिनिधी, दि.२० : शेवगावचे सहाय्यक निबंधक कार्यालयातील सेवानिवृत्त सहाय्यक अधिकारी शिरीष भारदे यांनी आपल्या पत्नीसह तीन हजार ६०० किलोमीटर अंतराची अतिशय कठीण अशी नर्मदा परिक्रमा ४ महिने ८ दिवसात पायी पूर्ण करून सर्व भाविकासमोर आदर्श उभा केला आहे. अशा शब्दात आमदार मोनिका राजळे यांनी भारदे यांचा गौरव केला.
भारदे यांच्या पाठपुराव्यातून शहरातील पुरातन कालीन श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून आ. राजळे यांनी नुकतीच श्री दत मंदिरास भेट देऊन भारदे दाम्पत्याचा गौरव केला. याप्रसंगी राजळे बोलत होत्या. भारदे दाम्पत्यांनी अतिशय समाधानकारक पद्धतीने पूर्ण केलेल्या या उपक्रमा बद्दल आ. राजळे यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी इंदोर येथील अच्यूतानंद सरस्वती महाराज, वंदना भारदे, राजश्री रसाळ, सागर फडके, राणेश रांधवणे, वसुधा सावरकर, योगिनी पाटील, किरण काथवटे, अमोल माने, संदिप गवळी, किरण लांडगे, अमोल घोलप, संकेत साळूंखे आदि भाविक उपस्थित होते.

