जनता स्कूलचे अंबीलवादे व बनसोडे सर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ :  तालुक्यातील जनता इंग्लिश स्कूल येथील पर्यवेक्षक शरद अंबिलवादे, उपशिक्षक बनसोडे सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे होते.

तर प्रमुख उपस्थितीमध्ये सहाय्यक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग अहमदनगर प्रमोद तोरणे, तसेच जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा एम. टी. रोहमारे, तसेच ज्येष्ठ सदस्य स्थानिक स्कूल कमिटी संवत्सर बाळासाहेब बारहाते, दिलीप बोरनारे स्थानिक सल्लागार समित संवत्सर मधुकर साबळे, अशोक लोहकणे, मा.चंद्रकांत लोखंडे मामा,  तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय काळे उपस्थित होते.

विदयालयातील विविध कमिटी व समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच विविध संस्था, पतसंस्था यांचे पदाधिकारी, अधिकारी, आजी-माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक बंधू-भगिनींनी व शाळेचे विदयार्थी व अंबिलवादे सर व बनसोडे सर यांच्या परिवारातील नातेवाईक, पाहुणे मंडळी, आजी-माजी विदयार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक व पंचक्रोशीतील नागरिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

त्यानंतर सत्कारमूर्ती मा.अंबिलवादे सर व बनसोडे सर यांचा विदयालयातर्फे व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल, व स्नेहवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.    अंबिलवादे सर यांनी 31 वर्षे 6 महिने सेवा केली व मा.बनसोडे सर यांनी 30 वर्ष रयत शिक्षण संस्थेत सेवा झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मा. वाघमारे सर व खेताडे सर तसेच टावरे मॅडम, यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोरे एस आर यांनी केले. तर सूत्रसंचालन सुनील वाघमारे सर, खेताडे सर, तसेच टावरे मॅडम आभार, बागुलसर यांनी मानले.