पंडितराव भारूड यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार २०२४ प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : तालुक्यातील पंडित जमनराव भारुड यांना सम्राट फाउंडेशन व आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विदयमानाने छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार २०२४ नुकताच महेश डाळिंबकर संचालक कायझेन अकॅडमी यांच्या अध्यक्षतेखाली समता हॉल कोपरगाव येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

यावेळी एडवोकेट बीए हुसळे हायकोर्ट लक्ष्मण सहाने डायरेक्टर ऑफ सेव्हलोन लिमिटेड मुंबई ,अध्यक्ष राहुल सोनवणे ,आदर्श फाउंडेशनचे सुनील मोकळ आदींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार २०२४  भारुड यांना प्रदान करण्यात आला असून पंडितराव भारुड यांनी आतापर्यंत साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजकता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असून ते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ संवत्सर यांच्या वतीने सातत्याने महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम घेऊन करत असतात.

त्याचप्रमाणे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पर गंडेतोडे ही अंधश्रद्धा निर्मूलन पर कादंबरी विद्रोही कविता संग्रह लाव्हा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित क्रांतीसूर्या नावाचं प्रबोधनात पुस्तक, प्रिंटेड सर्किट बोर्ड, कै. माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जीवनावर विजयीगाथा नावाची चित्रफित देखील तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे भारुड हे पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समस्या वृत्तपत्रातून नेहमी मांडत असतात.

अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असतात भारुड यांचे विविध क्षेत्रातले उल्लेखनीय काम पाहून सम्राट फाउंडेशन व आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार २०२४  हा पंडितराव भारुड यांना प्रदान केला. या यशाबद्दल त्यांचे पहिल्या महिला आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक बिपिन कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मा.बिपिन कोल्हे त्याचप्रमाणे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे आद विश्वस्त नितीन कोल्हे, विश्वस्त अमित कोल्हे व ग्रामस्थांनी भारुड यांचे सर्वत्र अभिनंदन केले.