कोपरगावच्या महसुल अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे गोदामपाल दिपक मच्छिंद्र भिंगारदिवे यांनी गुरुवारी सकाळी पुरवठा विभागाच्या गोदामात कर्तव्य बजावत असताना अचानक उलट्या करीत असल्याचे दिसुन आले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. भिंगारदिवे यांनी विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती पुढे आली आहे. माञ, त्यांनी आत्महत्या केली का? आणखी काही विषप्रयोग झाला.

याची माहीती कोणालाही मिळू शकली नसली, तरी दिपक भिंगारदिवे यांच्या आत्महत्येने महसुली विभागासह त्यांच्या मिञ परिवारात खळबळ उडाली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, दिपक भिंगारदिवे हे गेल्या दोन दिवसांपासून रजेवर होते. गुरुवारी सकाळी ११ वाजता धान्य पुरवठा विभागाच्या गोदामातील त्यांच्या कार्यालय आले. माञ, ते निरुत्साही दिसत होते.

तेथील हमाल व इतर कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असता मला अस्वस्थ होत असल्याचे सांगितले. काही वेळातच भिंगारदिवे यांना उलटी झाली. स्थानिक कर्मचारी व हमाल यांनी शहरातील मुळे हाॅस्पिटल मध्ये तातडीने उपचारासाठी दाखल केले असता. त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि काही वेळातच त्यांनी आपला प्राण सोडला.

डाॅक्टरांनी सांगितले की, त्यांनी विषारी औषध घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा १२ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिपक भिंगारदिवे यांनी विषप्राशन केले की, विषप्रयोग झाला हे कोणालाही समजले नाही. झालेली घटना त्यांच्या घरच्यांना कळवण्यात आली. कोपरगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहीती तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी दिली.

तहसीलदार भोसले म्हणाले की, दिपक भिंगारदिवे यांना कार्यालयीन कामाचा कोणताही तान नव्हता. त्यांचे स्वतंत्र कार्यालय आहे. ते कामात कार्यकुशल होते. सर्व व्यवस्थित असतानाही त्यांना का आत्महत्या केली हे समजले नाही. विष प्राशन करुन कामावर आल्याचे समजते. ते कोणत्या कारणाने हे कृत्य केले हे अजून तरी स्पष्ट झाले नाही. माञ, एक चांगला सहकारी आमच्यातुन कायमचा गेल्याची खंत व्यक्त करीत तहसीलदार भोसले यांनी शोक व्यक्त केले. 

 दरम्यान दिपक भिंगारदिवे हे नगरच्या भिंगार येथील रहिवासी असुन यांच्या पाश्चात्य पत्नी, आई, भाऊ, बहीणी, एक मुलगी व मुलगा आहे. गेल्या दोन वर्षांपासून गोदामपाल म्हणून कार्यरत होते. भिंगारदिवे यांच्या आकस्मिक मृत्युने संपूर्ण महसुल विभागावर शोककळा पसरली आहे.