शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : शेवगाव पाथर्डी तालुक्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षात गेली अनेक वर्षे निरपेक्ष भावनेतून काम करणाऱ्या मात्र, सध्याच्या राजकारणाला कंटाळलेल्या दोन्ही तालुक्यातील सुमारे शंभरावर कार्यकर्त्यांनी शनिवारी एकत्र येऊन चिंतन बैठकीच्या माध्यमातून शेवगाव पाथर्डी तालुका विकास मंडळाची पूनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून लोकसभा निवडणुकीत जो लोकांच्या कामाचा, तोच आमचा या राजकीय भावनेतून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना समर्थन देण्याचा निर्णय विकास मंडळाचे समन्वयक भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनिल रासने, पाथर्डीचे पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष केकाण यांनी चिंतन बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी एकमताने घेतलेला निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला.
राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष माजी केद्रिय मंत्री शरद पवार यांच्या रविवारी शेवगावात होणाऱ्या जाहीर सभेत हा निर्णय जाहीर करण्यात येणार असून या कार्यकर्त्यांनी फक्त राजकीय व सामाजिक शुद्धी करणाची भूमिका घेऊन पक्षाचे क्रीयाशील सदस्यत्व कायम ठेवून आपापल्या पक्षातील पदांचे राजीनामे श्रेष्ठींकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीमती विद्या गाडेकर, राम लाड, नवनाथ कवडे, विनायक नजन, विठ्ठल बिडे, राहूल वरे यांचे सह दोन्ही तालुक्यातील विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.