कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : – महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेसह मित्रपक्षांच्या सर्वच आघाड्या सक्रीय झाल्या आहेत. भाजपकडून सुक्ष्म प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहेत, तर राष्ट्रवादीकडून मित्रपक्षाची भूमिका चोख बजावण्यात येत आहेत. याशिवाय मनसे व आरपीआय आठवले गट देखील प्रचारात सक्रीय झाले आहे.
पुरूषांबरोबर शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीच्या महिला आघाडी देखील प्रचार जोरदार करताना दिसत आहे. या सर्वांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या सात पक्ष निरिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक दिवसाचा आढावा मंत्री दादा भूसे यांच्याकडून सातत्याने घेण्यात येत आहे. प्रचारातील प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचा विचार करण्यात येत असल्याने खासदार सदाशिव लोखंडे यांचा विजय सुखकर मानला जात आहे.
शिवसेनेकडून प्रत्येक तालुक्यात प्रचार सुरू केला आहेत. ज्या दिवशी तालुक्यात खासदार सदाशिव लोखंडे नसतील त्या दिवशी प्रचाराची जबाबदारी खासदारांच्या तिन्ही मुला पैकी एकाकडे असते. त्यांच्या जोडीला तालुका प्रमुखांसह सर्वच पदाधिकारी प्रचार फेरीत सहभागी होत आहेत. महिला आघाडीसोबत खासदारांच्या पत्नीसह सुना देखील प्रचारात सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
काही ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी मनसेसह आरपीआयचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिवसेनेसह भाजपच्या महिला आघाडीने पहिल्या टप्प्यात तरी वैयक्तिक व गृह भेटींवर भर दिला असून ग्रामीण भागात महिला बचतगटांना भेटी दिल्या जात आहेत. बचतगटांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती यावेळी दिली जात आहे.
खासदार सदाशिव लोखंडे तीनच्या लकी अंकावर आमदार- सलग तीन वेळा एकुण भाऊ- तीन, पुत्र- तीन मागील पंचवर्षीक अनुक्रमणिका क्रमांक – तीन, २०२४ च्या निवडणुकीचा अनुक्रमणिका क्रमांक- तीन, नरेंद्र मोंदीची पंतप्रधान पदाची टर्म- तीसरी, खासदार–तीसऱ्या टर्मसाठी उमेदवारी, अर्ज दाखल प्रचाराचा प्रमुख मुद्दा- गोदावरी, प्रवरा, मुळा तीन नद्यांचे पाणी वाढवणे, निवडणुकीची तारीख ही १३ मे असून त्यातही तीन अंक असल्याने खासदार सदाशिव लोखंडेसाठी तीन हा लकी अंक मानला जातो.
भाजपचे प्रचारात सात मोर्चे व चोवीस आघाड्या सक्रीय झाल्याचे पहायला मिळत आहे. प्रत्येक आघाडीची जबाबदारी ही तालुका प्रमुखावर असते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या सर्वच आघाड्या सक्रीय केल्याचे दिसत आहे. भाजप युवा मोर्चाकडून लवकरच मतदार संघातील मोठ्या शहरांमध्ये प्रचार फेऱ्या काढून नवीन मतदारांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कळतंय. नवीन व जूने भाजपचे पदाधिकारी सक्रीय झाल्याने प्रचारात रंगत पहायला मिळत आहे. भाजपचे विस्तार प्रमुख यांनी आपले बुथ प्रमुख सक्रीय केल्यानं पहिल्या टप्प्यात घरोघरी प्रचार साहित्य पोहचवण्यावर भर दिला जात आहे.
मतदार संघात ओबीसींची संख्या जास्त असल्याने भाजपची ओबिसी आघाडी सक्रीय झाल्याचे दिसत आहे. ओबिसीं आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी ही ओबीसीं आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांच्यावर असून त्यांनी मतदार संघात अनेक ठिकाणी बैठका लावून अब की बार चार सौ पारचा नारा दिला आहे. तर धार्मिक आघाडीची जबाबदारी बबन महाराज यांनी घेतल्याचे दिसत आहे. शिवसेनेची शेतकरी सेना देखील प्रचार करताना दिसत आहे. शेतकरी सेनेचे शाम रहाणे, भगीरथ होन यांनी दोन्ही जिल्हा प्रमुख स्वतंत्र बैठका घेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही कार्यकर्तेही पहिल्याच टप्प्यात सक्रीय झाले आहे. जिल्हाध्यक्ष कपील पवार यांनी ही जबाबदारी स्विकारत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार दौऱ्याच्या नियोजनात व प्रचार फेरीत सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे व आमदार किरण लहामटे यांनीही कार्यकर्त्यांना प्रामाणिक काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिर्डी मतदार संघातही मनसेचे कार्यकर्ते सक्रीय झाले आहे. मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे व बाबा शिंदे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत प्रत्येक तालुक्यातील तालुका प्रमुखांना विश्वासात घेऊन प्रचारात सहभागी केले जात आहे.
आरपीयच्या समन्वयाची जबाबदारी जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात यांनी घेतली आहे तर रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे हे देखील प्रचारात सक्रीय झाल्याने महायुतीतील सर्वच आघाड्या प्रचारात सक्रीय झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना ही निवडणूक सहज जाताना दिसत आहे.