कोल्हे परिवार कधीच पाठीत खंजीर खुपसत नाही – स्नेहलता कोल्हे 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोल्हे परीवार दिल्या शब्दाला जागणारा आहे. पोटात एक आणि ओठात एक कधीच नाही. पक्ष व पार्टीशी एकनिष्ठ राहुन आजपर्यंत काम केले म्हणुनच जनता आपल्या पाठीशी आहे. पण काहीजन ऐन वेळेस दगाफटका करुन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करतात पण कोल्हे परिवार कधीच कोणाला दगाफटका करीत नाही किंवा पाठीत खंजीर खुपसत नाही असे म्हणत स्नेहलता कोल्हे यांनी थेट पक्षांतर्गत विरोधक करणाऱ्यांवर निशाण साधत ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपली परखड भूमीका पक्षश्रेष्ठींना कळल्याने कोल्हे यांच्या भूमिकेकडे शिर्डी लोकसभा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी दोन वेळा आले. माञ कोल्हे परिवार लोखंडे यांच्या प्रचारासाठी मनापासून उतरले नाहीत यावरून भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या मनातील खदखद पञकारासमोर व्यक्त केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला त्या म्हणाल्या की, पालकमंत्री म्हणून आजी माजी आमदारांना त्यांच्याकडून अपेक्षा असते.

विविध विकास कामांचा निधी मिळावा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे विकास कामे व्हावीत माञ पालकमंत्री यांनी निधी देण्यात दुजा भाव केल्याच्या तक्रारी कोपरगाव मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केल्यामुळे आपण सध्या नाराज आहोत. तशी मनातली नाराजी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केली आहे. लवकरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाराजी दूर करतील. त्यानंतर कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील असेही त्या म्हणाल्या 

 दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे कोल्हेंचा पराभव झाला. केवळ कोल्हेंचा नाही तर जिल्ह्यातील अनेक उमेदवार त्यांच्यामुळे निवडून येवू शकले नाहीत अशा तक्रारी आमदार राम शिंदेसह अनेकांनी केल्या होत्या तेव्हा पासून विखे यांच्यावर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार नाराज होते. 

पक्षश्रेष्ठींनी काहींची नाराजी दूर केली तर काहींची खदखद आजूनही आहे. अशातच कोल्हे लोकसभा निवडणुकीत कुठेही सक्रिय दिसत नाहीत. त्यांची नाराजी पक्षश्रेष्ठीपेक्षा पालकमंत्री विखे यांच्यावर आहे. जो पर्यंत कोल्हे यांची नाराजी दूर होत नाही किंवा त्यांचे कार्यकर्ते मनापासून सक्रिय होत नाहीत तो पर्यंत कोपरगाव मध्ये महायुतीच्या उमेदवारांसह इतर उमेदवारांची धाकधूक कायम आहे. पक्षांतर्गत कोल्हेंना झालेला ञास कार्रकर्त्यांना सहन झाला नाही. कोल्हे यांची सध्या भूमीका गुलदस्त्यात असल्यासारखी जरी असली तरी अनेकांची धाकधूक वाढवणारी आहे. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हे यांना काय आश्वासन देतात यावरून  युवा नेते विवेक कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची भूमिका स्पष्ट होईल.