शेवगाव प्रतिनिधी, दि.३० : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित गुरुपिठाच्या शेवगाव स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त मंगळवार दि.३० एप्रिल ते सहा मे २०२४ अखेर येथील खंडोबा नगरमध्ये श्री गुरुचरित्र पारायण अखंड नाम जप, तप, यज्ञ सेवा सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भावीकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी आवाहन संयोजकांनी केले आहे.
यानिमित्त सकाळी आठला भूपाळी आरती सव्वा आठला नित्यस्वाहाकार, साडेआठला गुरुचरित्र पारायण, नैवेद्य आरती, विशेष याग, दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र पाठ औदूंबर प्रदक्षिणा, नैवेद्य आरती व नित्यसेवा व नित्यध्यान असे दैनंदिन कार्यक्रम आहेत.
मंगळवारी सप्ताह प्रारंभ होऊन प्रहरे व गुरुचरित्र पारायणास प्रारंभ करून अग्निस्थापना करून नित्य स्वाहाकार करण्यात आला. बुधवारी श्रीगणेश याग, मनोबोध याग, गुरुवारी श्रीस्वामी याग, शुक्रवारी चंडी याग (कुलदेवीची उच्च कोटीची सेवा), शनिवारी श्रीगिताई याग, रविवारी श्री रुद्र याग व श्री मल्हारी याग अशा विधिसह रोज नित्यस्वाहाकार होणार आहे.
सोमवारी दि.६ मेला श्रीगुरुचरित्र पारायण समाप्ती, नित्यस्वाहाकार, बलीप्रदान पूर्णाहूती, श्री सत्यदत पूजन सकाळी साडेदहाला महानैवेद्य आरती व देवता विसर्जन व अखंड नाम जप तप यज्ञ सप्ताह सांगता असे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम आहेत. या सप्ताहासाठी केंद्रप्रमुख पृथ्वीराज देशमुख,
मार्गदर्शक उद्धवराव सोनवणे, सुहास धस, अशोक नलवडे, बंडू भोर, अशोक कांबळे, तारा रेवाडकर, मिना ढाकणे, शीला अभंग यांनी विशेष योगदान दिले आहे.