शेवगावध्ये १२ पैकी १० पंचायतीत महिलांनी बाजी मारली

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पाहिल्या टप्यात पार पडलेल्या बारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीने ७, भारतीय जनता पक्षाने ३ तर जनशक्ती विकास आघाडी
व अपक्षाने एकेका ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत १२ पैकी १० पंचायतीत महिलांनी बाजी मारली आहे.

       तालुक्यातील दहिगावने, जोहरापूर, खामगाव, भायगाव , प्रभू वाडगाव, खानापूर व रांजणी अशा सात ठिकाणी राष्ट्रवादीने तर अमरापूर, वाघोली व सुलतानपूर खुर्द या तीन ठिकाणी  भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारली. आखेगाव ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी जनशक्ती विकास आघाडीचे तर रावतळे कुरुडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

     तालुक्यात पार पडलेल्या बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी आज तहसील कार्यालय तहसीलदार छगनराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  झाली. मतमोजणीसाठी सहा टेबल मांडण्यात आले होते.  यावेळी तहसील कार्यालयाच्या परिसरात जमलेल्या विजयी उमेदवाराच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके  वाजवून गुलाल उधळत आपला आनंद व्यक्त केला.      

तालुक्याची राजधानी संबोधली जाणाऱ्या दहिगाव ने ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या विजयी उमेदवार सुनिता देवदास कांबळे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार विमल अंबादास सातपुते यांचा  दोन हजार १०४ मताधिक्यांनी पराभव केला. या ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होऊन झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ७ उमेदवार विनविरोध करुन आपला विजय अधोरेखित केला होता. तरीही विरोधी भाजपाच्या उमेदवार विमल सातपुते यांना ७७६ मते मिळविली आहेत.

    जोहरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीच्या स्नेहल रोहन लांडे यांनी विजय मिळविला. त्या जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे पाटील  यांच्या स्नुषा आहेत. स्नेहल लांडे यांना ७१२ मते तर जयश्री शिवाजी खेडकर यांना ६१७ मते मिळाली. खामगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या दुरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या विद्या अरुण बडधे यांनी बाजी मारली . त्यांनी सरळ लढतीत उषा सुभाष बडधे यांच्यावर केवळ बारा मतांनी विजय मिळवला.  विद्या बडधे यांना ३८६ तर उषा बडधे यांना ३७४  मते मिळाली. भायगाव ग्रामपंचायतीत मनीषा राजेंद्र आढाव विजयी झाल्या. त्यांनी ८७४ मते मिळवून  आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पुष्पा अण्णासाहेब दुकळे यांचा २१०मतांनी पराभव केला. येथे राष्ट्रवादी अंतर्गत दोन गटात लढत झाली.

      प्रभू वाडगाव ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपप्रणीत मंडळाचे ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रयागा गुलाब अंगरखे यांचा ४७३ मतांनी पराभव केला. प्रयागा अंगारखे  यांना ४०१मते मिळाली. विजयी उमेदवार घोडेराव यांना ८७४  मते मिळाली. खानापूर ग्रामपंचायतीत  पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश थोरात यांच्या पत्नी शितल मंगेश थोरात यांनी विरोधी उमेदवार दुर्गा नवनाथ थोरात यांचा ७४ मतांनी पराभव केला. शितल थोरात यांना ५५२  तर दुर्गा थोरात यांना ४७८ मते मिळाली. रांजणी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाच्या   पंचरंगी लढतीत राष्ट्रवादीचे काकासाहेब मुरलीधर घुले यांनी बाजी मारली. काकासाहेब घुले यांना ६९५ तर विरोधी उमेदवार विकास आबासाहेब थोरात यांना ४०० मते मिळाली.

      वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या सुस्मिता उमेश भालसिंग या विजयी  झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी समर्थक निर्मला प्रकाश वांढेकर यांचेवर ८५६ मताधिक्यांनी मात केली . सुIस्मिता भालसिंग  यांना १४०८ तर निर्मला वाढेकर यांना ५५२ मते मिळाली .उमेश भालसिंग यांनी गेल्या पाच वर्षाच्या आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात विविध विकास कामाबरोबर  शासनाच्या वसुंधरा अभियानात उत्कृष्ट काम करून वाघोली ग्रामपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांकाचे दीड कोटी रुपयाचे पारितोषिक मिळवून दिले. ते त्यांच्या विजयात कारणीभूत ठरले.

     तालुक्यात अमरापूर ग्रामपंचायत निवडणूक लक्षणिय ठरली . अमरापूर पॅटर्न म्हणून लौकिक मिळविलेल्या या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे अधिपत्य होते . मात्र तेथे अनेकांना सत्तेचे डोहाळे लागले. त्यामुळे सरपंच पदासाठी तब्बल ७ जण दंड ठोकून  निवडणुकीत उतरले . या लक्ष वेधी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या  महिला आघाडीच्या तालुकाअध्यक्ष आशाताई बाबासाहेब  गरड या सरपंच पदाच्या मानकरी ठरल्या. त्यांनी धनंजय दिलीप खैरे यांचा २२४ मताधिक्याने पराभव केला .राष्ट्रवादी समर्थक चांगदेव प्रेमचंद भूकन हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ३३९ मते मिळाली.

       सुलतानपूर खुर्द (फलकेवाडी ) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपच्या डॉक्टर सविता  विजय फलके या निवडून आल्या . त्यांनी दुरंगी लढतीत संध्या सुरेश काते यांच्यावर ५३२मताधिक्काने विजय मिळविला.  डॉ .फलके यांना ८०७मते मिळावी तर काते यांना २७५ मतावर समाधान मानावे लागले.  आखेगाव तितरफा ग्रामपंचायतीत  जनशक्ती विकास आघाडीच्या आयोध्या शंकर काटे यांनी  ६०७ मतांनी विजय मिळवला. आयोध्या काटे यांना १३२५ मते मिळाली.जयश्री चंद्रकांत काटे यांना ७१९मते मिळाली. तर  सोनाली भागीनाथ खर्चन यांना ५५९ मते  मिळाली.  रावतळे कुरडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी स्थानिक आघाडीच्या चंद्रकला कल्याण कवडे यांनी बाजी मारली त्यांना ७४३ मते मिळाली तर छाया पांडुरंग आवटी यांना ४०८ मते मिळाली. मतमोजणीसाठी  नायब तहसीलदार मयूर बेरड, प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार राहुल गुरव ,महसूल सहाय्यक आनंद गुसिंगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


     बारा ग्रामपंचायतीत निवडूण आलेले सदस्य असे –

सुलतानपूर :
सविता विजय फलके ( सरपंच, भाजप )
कविता शिरीष काळे
मच्छिंद्र एकनाथ डोईफोडे
सविता अशोक शिंदे
धनंजय सुरेश फलके
रवींद्र किशोर फलके
अमर शेषराव जाधव
सुमन बाळासाहेब मरकड
वाघोली : 
सुस्मिता उमेश भालसिंग ( सरपंच, भाजप )
राजेंद्र अशोक जमधडे
नलाबाई कार्लस आल्हाट
सुकदेव नाथा शेळके
हिराबाई रावसाहेब शिंगटे
कल्पना पांडुरंग भालशिंग
मोहन बाबुराव गवळी
घनश्याम निवृत्ती वांढेकर
कांताबाई बबन बोरुडे
निर्मला गोरक्षनाथ दातीर
प्रभूवाडगाव :
ज्ञानेश्वर निवृत्ती घोडेराव ( सरपंच, राष्ट्रवादी )
आजिनाथ माणिक जायभाय
अनिता श्रीकृष्ण बटुळे
मुक्ताबाई कचरू बटुळे
अर्जुन बाजीराव दराडे
मंदा राजेंद्र अंगरखे
अनिता गणेश बटुळे
दीपक त्रिंबक बटुळे
किरण बाबासाहेब कराड
मनीषा देविदास बटुळे
अमरापूर :
आशा बाबासाहेब गरड ( सरपंच, भाजप )
मुस्तकीन युनूस शेख
समीर रफिक शेख
आशा बाबासाहेब गरड
गणेश शिवाजी बोरुडे
मनीषा दीपक क्षीरसागर
मनीषा रमेश खैरे
राम दत्तात्रय पोटफोडे
शोभा बाळासाहेब सुसे
सोमेश्वर अशोक खैरे
माया ज्ञानेश्वर म्हस्के
चंदाबाई विक्रम खैरे
खामगाव :
विद्या अरुण बडधे ( सरपंच, राष्ट्रवादी )
विजय बबन तुजारे
दिगंबर भगवान बडधे
मीराबाई राजेंद्र घोलप
मोसिन पटेल
आयेशा फिरोज काझी
आशा कैलास जाधव
उमा सुभाष बडधे
आखेगाव :
आयोध्या शंकर काटे( सरपंच, जनशक्ती आघाडी )
संजय श्रीधर पायघन
रोहिणी बाबासाहेब गोरडे
निर्मला एकनाथ काटे
संजय विष्णू काटे
कौसाबाई अण्णासाहेब कोल्हे
मालन सिनाप्पा फुलमाळी
अशोक बन्सी गोरडे
अश्विनी नितीन खंडागळे 
रवींद्र भाऊसाहेब ससाने
घनश्याम विठ्ठल पायघन
शारदा अरुण खर्चन
जोहरापुर :
स्नेहल रोहन लांडे ( सरपंच, राष्ट्रवादी )
साहेबराव विश्वनाथ कुसारे
हिराबाई शंकर देवढे
मुक्ता महादेव ढगे
अनिल श्रीराम आढाळगे
शिवाजी सहदेव खेडकर
शोभा राजेंद्र पालवे
विष्णू निवृत्ती उगलमुगले
पपीता जालिंदर वाकडे
आशा बाळासाहेब उगलमुगले
रांजणी :
काकासाहेब मुरलीधर घुले ( राष्ट्रवादी )
सोमनाथ भाऊसाहेब कर्डिले
योगेश्वर हरिभाऊ गवळी
सुरेखा संभाजी घुले
परशुराम रघुनाथ पवार
कमलबाई देवदत्त गायकवाड
सविता कैलास मोरे
अरुण केशव थोरात
अंजना संभाजी वाल्हेकर
शितल उद्धव चव्हाण
भायगाव :
मनिषा राजेंद्र आढाव ( सरपंच, राष्ट्रवादी )
अशोक प्रभाकर देशपांडे
शांताबाई प्रकाश सौदागर
शोभा रामदास तांबोरे
सुभाष सोना सौदागर
आशा एकनाथ लांडे
दिपाली अनिल लांडे
सुरज खंडेराव देशपांडे
विठ्ठल घनश्याम पालवे
नर्मदा मोहन जगधने
कुरुडगाव / रावतळे
चंद्रकला कल्याण कवडे ( सरपंच, अपक्ष )
रोहिदास कचरू नीळ
तुकाराम ज्ञानदेव औटी
भिमाबाई बाबासाहेब गोरडे
भाऊसाहेब छगन शिंदे
कल्पना अण्णासाहेब काळे
कस्तुराबाई कल्याण काळे
प्रशांत विनायक भराट
शितल भारत निळ
वर्षा नितीन भराट
खानापूर :
शितल मंगेश थोरात ( सरपंच, राष्ट्रवादी )
योगेश अण्णासाहेब चेडे
अलका बबन आव्हाड
दिपाली कल्पेश दळे
रामदास रावसाहेब गोरे
आश्विनी शिवाजी भारस्कर
संगीता नानासाहेब चेडे
तात्यासाहेब बाप्पासाहेब थोरात
गणेश पंडित पातकळ
प्रीती उमेश मोरे
दहिगाव ने :
सुनिता देवदान कांबळे. ( राष्ट्रवादी )
विष्णू ताराचंद खंडागळे
संतोष मोहन घुले
गोटीराम यशवंत काळे
सूर्यकांत लक्ष्मण पाऊलबुद्धे
चंद्रकला जगन्नाथ वीर
नसीम रशीद शेख
प्रयागा लक्ष्मण काशीद.