राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्वजसंचालन, स्नेहलता कोल्हे यांच्याकडून पुष्पवृष्टी 

Mypage

कोपरगांव प्रतीनिधी, दि. ६ :  दुसऱ्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी निर्माण करण्यासाठी स्वतः झटत रहा ही संस्कार शिकवण देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि स्थापना विजयादशमीच्या मुहूर्तावर झाले, ती आठवण ध्वज संचलनातून आजही कायम आहे असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी केले.

Mypage

         शहरातील मुख्य रस्त्यावर संघाचे ध्वजसंचलन झाले त्यावेळी त्यांनी स्वतः पुष्पवृष्टी केली. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते. हलता कोल्हे पुढे म्ह‌णाल्या की, भारतीय जनता पक्ष एक विचार आणि सर्वसमावेशक जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्त संघ विचारधारेतून पक्ष संघटनासाठी बळ मिळते. 

tml> Mypage

        भारतासह जगातल्या १५६ देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरु आहे. डॉ. हेगडेवार यांनी २७ सप्टेंबर १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिस्त आणि संस्कारातून तुम्हा-आम्हांला सर्वांना एक विचार दिला. जगभरातील ५७ हजार संघ शाखेतून संस्कार दिले जातात. सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक दसरा मुहुर्तावर सर्वांना दिलेले विचार प्रत्येकाने आत्मसात करून स्वत: बरोबर तळागाळातील उपेक्षितांचा उत्कर्ष साधावा असेही कोल्हे म्हणाल्या. 

Mypage