अमरापुर येथील ग्रामदैवत श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवास प्रारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : श्रीक्षेत्र अमरापुर येथील ग्रामदैवत श्री काल भैरवनाथ तीन दिवसीय यात्रा महोत्सवास आज मोठ्या धूम धडाक्यात प्रारंभ झाला. भाविकांनी श्री क्षेत्र पैठणून आणलेल्या पायी गंगाजल कावडीची तसेच श्री काल भैरवनाथ पादुकांची शनिवारी सायंकाळी गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Advertisement

रविवारी सकाळी ७ वा. श्री काल भैरवनाथाला गंगाजलाचा अभिषेक तर रात्री ८ ला छबीना व श्री कालभैरव पालखी मिरवणूक होणार आहे.  त्यानंतर बारामती येथील ‘धुमाकूळ’ आर्केस्ट्राचा जाहीर कार्यक्रम तर रात्री  साडेअकराला नयनरम्य अशी शोभेची दारू व दारूची आतषबाजी होणार आहे.

सोमवारी सकाळी ८ वा. कलाकारांच्या हजऱ्या होणार असून सायंकाळी ४ ला महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाऊस यांचे प्रमुख उपस्थितीत कुस्त्यांचा जंगी  हंगामा होणार आहे. रात्री नऊ वाजता दत्तोबा तांबे लोकनाट्याचा कार्यक्रम असे विविध स्वरूपाने कार्यक्रम आहेत. तरी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त  भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा समितीने केले आहे.