आमदार राजळे यांनी पावसाची परवा न करता, मतदारासी संपर्क साधला

शेवगाव प्रतिनिधी, दि .१२ : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहिले असल्याने शेवगाव पाथर्डी मतदार सघाती प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे.  भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखेपाटील यांच्या प्रचारार्थ आमदार मोनिकाताई राजळे यांनी शुक्रवारी सायंकाळी पावसाची बुरबुर सुरु असतांना शेवगावातून प्रचार फेरी काढली. रात्री साडेआठ नतर शहराच्या चार उपनगरातील वस्त्यावर रात्री उशीरा पर्यंत बैठका घेत मतदारासी संपर्क साधला.

          पाथर्डी येथील माजी मंत्री पंकजा मुंढे यांची प्रचार सभा उरकुन आ. राजळे आमरापूरला आल्या. तेथे कार्यकर्त्याची बैठक घेऊन आज सायंकाळी साडेपाचला शेवगावच्या क्रान्ती चौकानील पावन गणपतीचे दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्त्यासह बाजार पेठेतून व्यावसायिकाच्या गाठी भेटी घेत खालच्या वेसी तील हनुमान मंदिरात तेथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तेथून पुढे शास्त्री नगरमधील संतोषी माता मंदिराच्या प्रांगणात तसेच त्यानंतर इंदिरानगर व भास्कर वाडीत रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कोपरा बैठका चालू होत्या.