सामान्याच्या प्रश्नाची जाण असणारा माणुस निलेश लंके – रोहीत पाटील

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : रात्री बेरात्री कधीही फोन केला तरी मदतीला धावणारा आणि सामान्यतील सामन्य मानसाच्या प्रश्नाची जाण असणारा गाव गाड्यातला मानुस निलेश लंके यांना निवडूण देवून दिल्लीत पाठवा असे आवाहन युवा नेते रोहीत आर. पाटील यांनी येथे केले. महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील बोधेगाव येथे राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहीत पाटील यांच्या शनिवारी आयोजित केलेल्या जाहीर सांगाता सभेत ते बोलत होते.

        यावेळी पाटील म्हणाले,  ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे लंके यांचा विजय ही काळा दगडावरची रेघ आहे. दहा वर्ष सत्ता असताना प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या मतदार संघात सभा घ्याव्या  लागल्या. दहा वर्षात केलेल्या विकास कामावर न बोलता त्यांना  आमच्याकडे बघुन मतदान करा असे सांगावे लागले. यातच सर्व काही आले. विरोधी भाजपाचे उमेदवाराचे आजोबा अनेक वर्ष सत्तेत होते. वडील पालकमंत्री आहेत. त्यांनीं विकास कामे सांगून मते मागाणे अपेक्षित होते, पण जाती धर्मात भांडणे लावायचे, समाजात तेढ निर्माण करायचे हे त्यांचे काम आहे.

बीडच्या सभेत नरेंद्र मोदींनी स्व. गोपिनाथ मुंढे यांची आठवण काढली. इतक्या दिवस त्यांना मुंढे साहेब आठवले नाहीत. केवळ वेळ आल्यावर आठवण काढायची. त्यामुळे जातीधर्माच्या नावावर मते मागणाऱ्यांना थारा देऊ नका असे आवाहन करून  ते म्हणाले राज्यातील सगळे उद्योग गुजरातला पळवले. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अतंकवादी ठरवले. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या हे सरकार गरिबाचे नाही. 

राजकारण आणि समाजकारणात नगर जिल्हयाची राज्यात ओळख आहे. स्व. बाळासाहेब भारदे, स्व. मारुतराव घुले पाटील, स्व. बबनराव ढाकणे, स्व. आबासाहेब काकडे, स्व. डॉ. पुरनाळे यांनी राज्याला दिशा देणारे राजकारण केले. निलेश लंके यांची त्यांच्या कामामुळे राज्यात ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्राची मान दिल्लीत ताठ ठेवायची असेल तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही. राज्याची ताकत पवार साहेबांच्या मागे उभी करण्यासाठी निलेश लंकेला निवडून द्यावे असे आवाहन पाटिल यांनी केले.

यावेळी ॲड. प्रताप ढाकणे, नितीन काकडे, रामदास गोल्हार, संजय वडते, माणिक गर्जे यांची भाषणे झाली. मंचावर राजेंद्र दौंड, शिवशंकर राजळे, फिरोज खान, आयुब शेख ,बोधेगांवचे उपसरपंच पै. संग्राम काकडे, सोसयटी चे माजी चेअरमन महादेव घोरतळे , सुनिल खंडागळे, गणेश उगले, रमेश गर्जे, पोपट केदार  उपस्थित होते. माजी जिप  सदस्य प्रकाश भोसले यांनी प्रास्ताविक केले तर भगवान मिसाळ यांनी आभार मानले.