चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. साहिल त्रिंबक खोत, डॉ. साक्षी कैलास सेठी, तसेच रुग्णवाहिका चालक संजय शिंदे यांच्या निष्काळजीपणामुळे कारवाडी येथील रेणुका किरण गांगुर्डे वय २० वर्षे या गरोदर मातेचा उपचार अभावी मृत्यू झाल्याने या तिघांवर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी वरील तिघांविरुद् तक्रार दाखल केली आहे. त्यात ते म्हणाले की, गरोदर माता रेणुका गांगुर्डे हिला प्रसूती दरम्यान उपचाराची गरज असताना ही चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ डॉ. साहिल खोत, डॉ. साक्षी सेठी हे आरोग्य केंद्रात कर्तव्यवर हजर नव्हते, तसेच रुग्णवाहिके वरील चालक संजय शिंदे याने रुग्णवाहिकेमध्ये पुरेसे इंधन न ठेवल्यामुळे संबंधित गरोदर मातेला इतर ठिकाणी घेऊन जाण्यास उशीर झाला.

डॉ. खोत व डॉ. सेठी हे वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोग्य केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी हजर न राहता लोकसेवक या नात्याने यादोघांनी कायद्याची अवज्ञा केली. तसेच चालक शिंदे याने रुग्णास दुसरीकडे घेऊन जाण्यास दिरंगाई करून या तिघांनीही कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळेच गरोदर मातेच्या मृत्यूस हे कारणीभूत ठरले आहे. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर पोलीस ठाण्यात घोलप यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर, धामोरी उपकेंद्रातील आरोग्य परिसेविका सी. एल. आरखडे, समुदाय आरोग्य अधिकारी नेहा वाघमारे यांच्या विरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहे.

ReplyReply allForward