कोळगाव थडी येथे धार्मिक ग्रंथाची विटंबना, अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : कोळगाव थडी येथील एका धार्मिक स्थळाच्या शेजारी असलेल्या अभ्यासिका खोलीमधून धार्मिक ग्रंथ उचलून नेऊन त्यातील काही पाने गावातील रस्त्याच्या कडेने अस्ताव्यस्त टाकल्याने संबंधित धर्मातील नागरिकांच्या भावना दुखावल्या.

Mypage

ही घटना शुक्रवारी सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित समाज बांधवांचा समूह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनवर धडकला. शेकडो समाज बांधवांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला.

Mypage

पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करून, धार्मिक तेढ निर्माण करून धर्मग्रंथचा अवमान करणाऱ्याचा लवकरच शोध घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

Mypage

दरम्यान पोलीस निरीक्षक देसले यांनी एका तरुणाला सदर प्रकारणाची माहिती घेण्यासाठी बोलावले असता, दुसऱ्या समाजातील शेकडो तरुण एकत्र येऊन पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला. त्या शेकडो तरुणांमध्ये माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचाही समावेश होता. दोन समाजाचे शेकडो नागरिक पोलीस स्टेशनला धडकल्यामुळे शहरासह तालुक्यातील वातावरण काही वेळासाठी गढूळ झाले.

Mypage

घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी उपस्थित जनसमुदायाला झालेल्या घटनेबद्दलचा समज गैरसमज दूर करून दोन्ही गटाच्या मागणीचे निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सायंकाळी साडे पाच वाजता वातावरण निवळले. धार्मिक ग्रंथाची विटंबना करणाऱ्याची पोलीस कसून शोध घेत आहे.

Mypage

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना या प्रकरणाबाबत विचारले असता. त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पत्रकारांनी घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी मिटके यांच्याशी संवाद साधत होते. मात्र त्यांनी घटनेची माहिती न देता पत्रकारांनी त्याच्या परीने माहिती घ्यावी असे सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *