स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नाने कोळ नदीवरील बंधारे भरले

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : तालुक्याच्या पूर्व भागातील आपेगाव, तळेगाव, गोधेगाव, घोयगाव, धोत्रे या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता कोळ नदीवरील बंधारे पाण्याने भरून मिळावे यासाठी या परिसरातील महिला भगिनींसह नागरिकांनी माजी आमदार कोल्हे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले होते, त्याला यश आले.

नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून पूर्व भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी माजी आमदार स्नेहलता बिपिन कोल्हे व विवेक कोल्हे यांचे प्रयत्नातून पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता झाली आहे याबद्दल पूर्व भागातील सर्व ग्रामपंचायत व महिला भगिनींच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले. स्नेहलता कोल्हे यांनी या प्रश्नावर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट पाठपुरावा केला होता.

चालू पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने पूर्व भागातील या परिसरातील पशुधनाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावर मार्ग काढण्यासाठी स्नेहलता कोल्हे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी या परिसरात बंधारे खोलीकरण व दुरुस्तीकरण याला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे, तोच वसा बिपीन कोल्हे यांनी पुढे चालवला आहे.