ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून नागरिक जखमी

शेवगावात नगरी सुविधाचा बोजवारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ :  शेवगाव शहरातील नगरी सुविधांचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. सध्या  ग्राम पंचायत बरी होती अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील लक्ष्मी हॉटेल समोर मुख्य रस्त्यालगत असलेले ड्रेनेजलाईनचे चेंबरवर झाकण नसल्याने अनवधानाने त्यात पडून कोणी जखमी झाले नाही असा दिवस जात नाही. रोजच होणाऱ्या अपधा ताच्या तक्रारी असूनही नगरपरिषदेला येथील उघड्या चेंबरर झाकण टाकण्याची सुबुद्धी होत नाही हे शेवगाव करांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

      असेच एक उघडे चेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही आहे. तेथेही कायम अपघात होत असत. या रस्त्याच्या कडेला असलेल्या फळविक्रेत्याने थोडे पुढे सरकून त्याची हातगाडी त्या उघडया चेंबरवर झाकणा सारखी उभी करण्याची शक्कल काढली. तेव्हा पासून येथील अपघात टळलेत. पण त्यामुळे येथील वाहतूक कोंडी वाढली आहे.

         नगरपरिषद प्रशासन नगरी सुविधाकडे दुर्लक्ष करत असल्याने नगरपरिषदेच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये अत्यंत चीड निर्माण झाली आहे. शेवगाव नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्यअधिकारी नाही.

पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे शेवगाव नगरपरिषदेल अतिरिक्त भार असल्याने ते आठवड्यातून एखाद्या वेळेस शेवगाव नगरपरिषदेला भेट देतात. नगरपरिषद सदस्यांची मुदत संपून तीन वर्षे लोटली तरी निवडणुक घेण्यात आली नासल्याने नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाहीअशी स्थिती आहे.

        शेवगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते व प्रभारी मुख्य अधिकारी तातडीने लक्ष घालून शहरातील उघड्या ड्रेनेजचे चेंबर बंद करावे अशी मागणी  शहरातील नागरिक करीत आहेत.