भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शिर्डीत भव्य बाईक रॅली

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आज रविवारी श्रीक्षेत्र शिर्डी नगरीत भाजप उत्तर नगर जिल्हा संघटनात्मक बैठकीसाठी आगमन झाले असता, भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांच्या वतीने भव्यदिव्य बाईक रॅली काढून बावनकुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दुचाकीला भाजपचे झेंडे लावून व गळ्यात उपरणे घालून शिर्डीतील मुख्य रस्त्यावरून जोरदार घोषणा देत निघालेल्या या रॅलीने वातावरण भाजपमय करून टाकत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीला अभूतपूर्व असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

भारतीय जनता पक्षाची अहमदनगर जिल्ह्याची संघटनात्मक बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (९ एप्रिल) श्री साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथील साई किमया लॉन्स येथे पार पडली. या बैठकीपूर्वी आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शिर्डी येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस येथून साई किमया लॉन्सपर्यंत उत्तर नगर जिल्हा भाजप व भाजयुमोच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये स्वत: प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी बुलेट चालवत सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

या रॅलीच्या अग्रभागी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगर महानगर अध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस योगेश मैंद, उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया संयोजक अमित सोळुंके, प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण बोरुडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, नगर शहर जिल्हाध्यक्ष महेश तावले, उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा, योगराजसिंग परदेशी, शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर, सचिन तांबे, सुनील वाणी, जालिंदर वाकचौरे, अशोक पवार, रवींद्र गोंदकर, योगेश गोंदकर, किरण बोराडे आदी नेते होते. 

या रॅलीचे संपर्कप्रमुख म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. रॅलीचे सुंदर नियोजन करून ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली त्या बद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी भारतमाता की जय, वंदे मातरम्, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, भारतीय जनता पक्षाचा विजय असो, पंतप्रधान नरेंदजी मोदी यांचा विजय असो, अशा विविध घोषणा देत शिर्डी नगरी दणाणून सोडली.

रॅलीच्या अग्रभागी एका सजविलेल्या वाहनात लावलेल्या लाऊडस्पीकरवरून ‘भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्नपूर्तीचे…’, ‘भाजपा एकमेव पक्ष श्रेष्ठ, भाजपा एकमेव तत्त्वनिष्ठ, भाजपा एकमेव बलाधिष्ठ, भाजपा भारताचे भविष्य…’ ‘नाद घूम दे, कमळ फुलू दे…’ अशी कर्णमधुर गीते वाजत होती, ज्यामुळे वातावरण भाजपमय झाले होते. कार्यकर्ते भाजपचे झेंडे फडकावत उत्साहाने घोषणा देत होते. या रॅलीत सहभागी झालेल्या भाजप, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

या रॅलीमध्ये भाजपचे कोपरगाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कोळपे, बाळासाहेब पानगव्हाणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगर परिषेदेचे माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, विनोद राक्षे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, कैलास खैरे, उत्तमराव चरमळ, दीपक चौधरी, अनुराग येवले, प्रशांत वाबळे, अंबादास देवकर, हरिभाऊ लोहकणे, कैलास रहाणे, सतीश केकाण, विशाल केकाण, मनोज इंगळे, विशाल गोरडे, गणेश भिंगारे, अंकुश कुऱ्हे, भीमा संवत्सरकर, विकास मोरे, जयेश बडवे, प्रसाद आढाव, राजेंद्र बागुल, संदीप देवकर, रवींद्र रोहमारे, संदीप उगले,

राजेंद्र औताडे, कानिफनाथ गुंजाळ, दिलीप शुक्ला, गणेश राऊत, पंकज कुऱ्हे, सागर शिंदे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील देवकर, शहराध्यक्ष सतीश रानोडे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीमभाई बागवान, खालिकभाई कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, शब्बीर इनामदार, निसार शेख,रफिकभाई शेख, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिऱ्हाडे, सिद्धू भाटिया, किरण सुपेकर, वैभव आढाव, शिवाजी खांडेकर, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, समीर सुपेकर, विक्रांत सोनवणे, राहुल सूर्यवंशी, मिलिंदकुमार साळवे, किरण सूर्यवंशी, मनोज इंगळे, अरुण सुपेकर आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भव्यदिव्य बाईक रॅलीने शिर्डीकरांचे लक्ष वेधून घेतले होते. शिर्डीत आज हजारो भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघालेली ही रॅली अभूतपूर्व होती, अशी प्रतिक्रिया ऐकावयास मिळाली. 

ही रॅली अत्यंत शिस्तीत नगर-मनमाड महामार्गावरून मार्गक्रमण करीत बैठकीच्या ठिकाणी म्हणजे साई किमया लॉन्स येथे पोहोचल्यानंतर तेथे भाजपची अहमदनगर जिल्ह्याची संघटनात्मक बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.