संजीवनी पॉलीटेक्निकच्या सहा अभियंत्यांची सॅनी कंपनीत निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २० : आपल्या नवोदित अभियंत्यांना विविध कंपन्यांच्या गरजेनुसार विशेष प्रशिक्षण देवुन त्यांना नोकरी मिळेपर्यंत सक्षम करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी ) विभागाकडून  आपल्या शेकडो नवोदित अभियंत्यांना नोकऱ्या  मिळवुन दिल्या आहेत.

याच  प्रयत्नांमधुन सॅनी हेवी इंडस्ट्रीजने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे निकाल जाहिर केले असुन यांत मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या सहा अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकला अगोदरच नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे, अशी  माहिती पॉलीटेक्निकच्या वतीने प्रसिध्दी पत्रकातुन देण्यात आली आहे.

बांधकाम आणि खाण उपकरणे, पोर्ट मशिनरी, ऑईल ड्रिलिंग मशिनरी आणि पवन ऊर्जा प्रणाली यासह अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय विस्तार असलेल्या सॅनी हेवी इंडस्ट्रीज या कंपनीने संजीवनीच्या अमित कुमार, गोल्डन सिंग, सौरभ बाळासाहेब चौधरी, कृष्णा संतोष  चव्हाण, आदित्य संजय भणगे व गुड्डू कुमार या सहा अभियंत्यांची निवड केली आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना वयाच्या १९ व्या वर्षी  संजीवनीच्या प्रयत्नामुळे नोकऱ्या  मिळत असल्याने पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबध्दल अनेक पालक संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त  करीत आहेत, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे  व प्राचार्य ए. आर. मिरीकर यांचे अभिनंदन केले आहे तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डीन अकॅडमिक डॉ. के.पी. जाधव, टी अँड  पी प्रमुख प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. जी.एन. वट्टमवार, प्रा. मोहिनी गुंजाळ, टी अँड  पी समन्वयक प्रा. पुणम थोरात, प्रा. नितिन  आहेर उपस्थित होते.

‘मी कोपरगांव तालुक्यातील धोत्रे गावच्या शेतकऱ्याचा  मुलगा. मला नोकरी मिळालीच पाहीजे, ही माझ्या आई वडीलांची व माझी उत्कट इच्छा होती. शिक्षण  पुर्ण झाल्यावर हमखास नोकरी कोठुन मिळेल याची आम्ही चाचपणी केली. अनेकांच्या मुखातुन एकच नाव पुढे आले आणि ते म्हणजे संजीवनी पॉलीटेक्निक आम्ही संजीवनीमध्ये माझा प्रवेश  निश्चित  केला. माझ्या अभियांत्रिकी विभागाचे सखोल ज्ञान मला तज्ञ प्राद्यापकांकडून मिळाले. याच बरोबर  टी अँड  पी विभागाने मुलाखतीची पुर्ण तयारी करून घेतली. या सर्व बाबींमुळे सॅनी हेवी इंडस्ट्रीजच्यचा प्रतिनिधिंनी विचारलेल्या प्रश्नांची  उत्तरे मी सहज देवु शकलो आणि माझी नोकरीसाठी निवड झाली, संजीवनीमुळे माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले, याचा आनंद आहे.’ – नवोदित अभियंता कृष्णा  चव्हाण