शिर्डी प्रतिनिधी, दि. १ : नांदुखीऀऀ बुद्रुक ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सचिन कोळगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नांदुखीऀ बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच किरण चौधरी यांची आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी लोकनियुक्त सरपंच माधराव चौधरी यांच्या अध्यक्षखाली सभा घेऊन सचिन सचिन लक्ष्मण कोळगे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सोन्याबापू चौधरी, राजेंद्र चौधरी, बाबुराव दाभाडे, पांडुरंग कोळगे, लक्ष्मणराव कोळगे, ज्ञानदेव चौधरी, जालिंदर चौधरी, संजय चौधरी, रंगनाथ चौधरी, वीरेश चौधरी, किरण चौधरी ,संजय वाघचौरे, चंद्रकांत दाभाडे ,आप्पासाहेब दाभाडे, संदीप वाकचौरे, अरुण चौधरी, विजय चौधरी, राजू चौधरी, अलका दाभाडे, शशिकला भराटे, पुनम काळोखे, योगेश गोसावी, अर्जुन आरणे, पुंजाहारी गोसावी, रामनाथ चौधरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच निवड प्रक्रियचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी श्रीराम कोते यांनी पाहिले. नवनिर्वाचित उपसरपंच सचिन कोळगे यांची निवड झाल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच माधराव चौधरी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
