उबेद मतीन शेख याचा आयुष्यातील पहिला रोजा

शेवगाव प्रतिनिधी, दि.०८ :  सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू असून येथे जिकडे-तिकडे आनंदाचे व भक्तीभावाचे वातावरण आहे. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजे ठेवतात. महिनाभर त्यामुळे सर्व मुस्लिम महिला पुरुष व युवक युवती इतकेच नव्हे तर लहान मुले-मुली सुद्धा रोजे ठेवून, नमाज व कुरआन पठण करून अल्लाहची उपासना करतात.

यामध्ये चिमुकले सुध्दा मागे नसतात. त्यांच्यातही रोजे ठेवण्याची व अल्लाहची इबादत करण्याची चढाओढ लागते. या पवित्र महिन्यात लहान मुले-मुलीही रोजा ठेवून अल्लाहकडे प्रार्थना करतात. उबेद मतीन शेख या ८ वर्षाच्या चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पुर्ण केला आहे.

दिवसभर रोजा ठेवल्यानंतर या पहिल्या रोजा प्रित्यर्थ तीचा पुष्पहार घालून सूर्यस्तानंतर रोजा सोडण्यात आला. दिवसभर रोजा ठेवून व नमाज पठण करून दुआ केली. त्यामुळे त्यांच्या परिवारात उत्साहाचे वातावरण असून उबेदचे कौतूक होत आहे.