डॉ.प्रवीण गादे यांना पीएचडी प्रदान

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ : तालुक्यातील भाविनिमगाव येथील प्रवीण सावता गादे यांना गाझियाबादच्या विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमीने (AcSIR), आज शुक्रवारी (दि २४ )पीएचडी पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे.

त्यांचे संशोधन कार्य सीएसआयआर (CSIR) केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (CFTRI), मैसूर येथे पूर्ण झाले असून त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय “स्टेरीग्माटोसिस्टिनचे बायोसेंसिंग आणि त्याचे निवारण” (Biosensing and Mitigation of Sterigmatocystin) हा होता. डॉ. प्रवीणा बी. मुदलियार यांच्या मार्गदर्शनाखाली गादे यांनी आपला संशोधन प्रबंध पूर्ण केला आहे.

डॉ. गादे यांनी DBT-JRF परीक्षा उत्तीर्ण करून भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून पीएच.डी. साठी शिष्यवृत्ती मिळवली होती. भावी निमगातचे निवृत्त प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सावता कान्हूजी गादे यांचे ते सुपुत्र आहेत.

         गादे  २०१७ मध्ये राज्य पात्रता परीक्षा (सेट) व :राष्ट्रीय पात्रता  (नेट ) परीक्षेमध्ये ते देशात ६३ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.इंजीनियरीग स्नातक अभिरुचिपरीक्षा  (गेट २०१८)मध्ये विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले  आहेत. त्यांनी पुणे विद्या पीठातून जैवतंत्रज्ञान विषय घेऊन एमएस्सी केले आहे . त्यांच्या  यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन ‘ होत आहे.