डॉ. प्रशांत भालेराव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : देशातील नऊ राज्यात १३९ शाखांद्वारे तब्बल अकरा लाखावर खातेदारांना बॅकिंग क्षेत्रातील समाधानकारक सेवा पुरविणाऱ्या देशातील  अग्रगण्य अशा  श्री रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन क्रेडीट  को ऑप .संस्थेचे प्रवर्तक, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव तथा प्रशांत नानांचा ४७ वा वाढदिवस शेवगाव पाथर्डी परिसरासह विविध शाखामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ठिकठिकाणच्या  शाखां द्वारे रक्तदान शिबीराचे , रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपाचे तसेच काही शाळांतील गरिब विद्यार्थ्याना वह्या पेन पुस्तके आदि शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपणाचे  आयोजन करण्यात आले.

   यावेळी सर्द प्रथम श्रीक्षेत्र अमरापूर मधील श्री रेणुका माता देवस्थानात श्री रेणुका मातेला नानांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर अमरापूर, शेवगाव, पाथर्डी या शाखामध्ये भरदिवसा शेकडो तोफा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी नानांना फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन पेढे  भरविण्यात आले. यावेळी त्यांच्या अनेक चाहत्यांनी  त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, डॉ .भाऊसाहेब लांडे पाटील, माजी नगरसेवक रामनाथ बंग,अशोक काका बोहती, नारायणबापू धस, उमेश मोरगावकर, अनिल साठे .प्रा ‘ .जनार्दन लांडे पाटील, परिमल बावर,  बाळासाहेब चौधरी, श्रीमंत घुले, डॉ .सुहास उरणकर, राजेंद्र दुधाळ, चांद मणियार, नितीन गटाणी, डाळींबकर ,राहुल जोशी, राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे, डॉ . अरविंद पोटफोडे, रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, सरपंच आशा गरड, तसेच दैनंदिन बचत प्रतिनिधी, खातेदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   नैतिकतेचे परिपाठ देऊन भालेराव कुटुंब सुसंस्कारित करणाऱ्या परमपूज्य वडिलांचे, चंद्रकांत दादांचे छत्र हरपल्या नंतर त्यांच्या पाठीमागे लाडक्या धाकट्या भावाने , योगेशने कोविड मध्ये अचानक साथ सोडली . तेव्हा धाकटे बंधू योगेश गेल्या पासून नानांनी चार वर्षात आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. यावेळी मात्र नानांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पुसटशी देखील कल्पना न देता तो अचानक ठिकठिकाणी साजरा केला.