शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुलने आपली इयत्ता दहावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राहिली असून श्रेया राजेंद्र भवर हिने 99.20टक्के मार्क मिळवत शाळेत सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला असून समृद्धी थोरे 98.40 टक्के गुण मिळवत द्वितीय तर जगदाळे अभिनव याने 97.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
श्रेया बोरुडे 97टक्के , श्रीसिद्धी जयस्वाल 97 टक्के, सायली चेमटे 96.40 टक्के सिध्दी भारदे 95.40 टक्के तर समीक्षा गोरे 94.20 टक्के,
प्राणहिता कवडे 95.20%, साई शेळके साई 95%, वैष्णवी डाके 94.20% तर शुभम देशमुख 94.40मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
शाळेचा शेकडा निकाल 93 टक्के लागला असून श्रेया भवर, अभिनव जगदाळे व अविनाश नरोडे यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.रमेश भारदे, विश्वस्त हरीश भारदे व प्राचार्य शिवदास सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.