निलेश लंके यांच्या विजयाचा शेवगावात जल्लोषात

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ :  महाविकास आघाडीचे नगर दक्षिण मतदार संघाचे उमेदवार निलेश लंके यांचा  मोठ्या मताधिक्याने  विजय झाला. त्याचे शेवगावात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या मतदारसंघाचा अधिकृत निकाल जाहीर होण्याअगोदरच भर दुपारी साडेतीनलाच पाथर्डी येथील रस्त्यावरील शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हरीश भारदे यांच्या कार्यालयासमोर ढोल ताशाच्या निनादात, हजारो फटाक्याच्या लडी व तोफांच्या आतषबाजीत व खासदार लंके यांच्या घोषणांनी आसमंत  दुमदुमून गेले.

भर उन्हात कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते. यावेळी निळ्या, पिवळ्या, भगव्या व गुलाबीअशा विविधरंगी गुलालाची उधळण करत भर उन्हात कार्यकर्ते  बेधुंद झाले होते. त्यानंतर क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व पेठेत देखील मोठ्या प्रमाणात फटाके तोफांची आतषबाजी करत घोषणाचा जल्लोष करण्यात आला.

यावेळी शरदश्चंद्र पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे, केदारेश्वर चे उपाध्यक्ष माधव काटे, स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे  जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेंट्रल ब्युरोचे सदस्य कॉ.संजय नांगरे, माजी सरपंच राहुल मगरे, एजाज काझी, वजीर पठाण, बाळासाहेब डाके, आप्पा मगर, उभाठा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर यांचे सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.