नाशिक शिक्षक मतदार संघात एका दराडेंचा दुसऱ्या दराडेंसाठी संघर्ष

  कोपरगाव प्रतिनिधी, दि.७ : नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक लागलीआहे. शुक्रवार हा उमेदवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता अशातच नाशिक शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला माञ किशोर दराडेंसाठी दुसऱ्या किशोर दरांडेंनी उमेदवारी अर्ज भरल्याने विद्यमान आमदार दराडे यांची डोकेदुखी वाढली आहे.

 नाशिक शिक्षक मतदार संघातील येवल्याचे  विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांना कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांचा सामना करावा लागणार आहे. माञ कोल्हे यांच्यापेक्षाही दराडे यांची डोकेदुखी ठरले आहेत ते म्हणजे कोपरगाव तालुक्यातील किशोर दराडे. नावात साम्य असलेले कोपरगावचे  किशोर दराडे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरल्याने विद्यमान आमदार दराडे यांची कोपरगावच्या उमेदवारांनी  झोप उडाली.

येवल्याचे किशोर दराडे यांना या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने कोपरगावचे किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरु नये किंवा जरी भरला तरी ते कसे माघार घेतील यासाठी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे व संपूर्ण दराडे समर्थकांनी सर्व प्रकारे प्रयत्न करू केले आहेत.  दबाव तंञासह इतर मार्गाने अर्ज माघार घेण्यासाठी आमदार नरेंद्र दराडे यांनी कोपरगाव येथे शुक्रवारी राञी उशिरापर्यंत आपल्या संपूर्ण यंञणेसह तळ ठोकून होते. 

 दरम्यान आमदार किशोर दराडे यांच्या उमेदवारीला बाधा ठरणारे कोपरगावचे किशोर दराडे यांच्यावर दबाव टाकुन माघार घेण्यासाठी आमदार दराडे यांनी कोपरगाव येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अजय गर्जे यांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोपरगावचे किशोर दराडे यांच्या वडीलांना बोलवून दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत होते त्या दरम्यान तिथे बाचाबाची झाल्याची माहीत आहे. कार्यकर्त्यांची गर्दी पोलीसांचा ताफा बघुन काही वेळ नागरीकांची गर्दी गर्जे यांच्या रूग्णालया बाहेर जमली. बघ्यांची गर्दी वाढू लागली पण नक्की काय झालं कोणालाही समजत नव्हते.

गर्दीत काळे-कोल्हे कार्यकर्ते दिसत होते. कोणीच काही सांगत नव्हते एकमेकांना खानाखूना करु लागले पोलीसांनी गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करीत होते.  माध्यमांचे प्रतिनिधी जमले डॉ. गर्जे यांच्या दरातील गर्दीने कोपरगाव शहरात चर्चेला उधाण आले. आमदार नरेंद्र दराडे माध्यमांच्या प्रतिनिधीं पासुन दूर होते. अखेर आमदार आशुतोष काळे यांचे कार्यकर्ते एकञ येवून काही तरी चर्चा केली आणि गर्जे यांच्या दारातही गर्दी कमी होवून साईबाबा तपोभूमी कडे कार्यकर्ते वळाले.