शेवगाव प्रतिनिधी, दि.२१ : हळदी कुंकू समारंभ हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. यानिमित्ताने महिला एकत्र येतात. विचार विनिमय करतात, सुखदुःखाच्या गप्पा मारत मनमोकळ्या होत असतात. म्हणून असे कार्यक्रम वरचेवर व्हायला हवेत असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री चंद्रशेखर घुले यांनी केले.
तालुक्यातील ढोरजळगावने येथे जया एकादशी निमित्त बडे वस्ती वरील वामनभाऊ देवस्थान मंदीराच्या प्रांगणात आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम आणि आनंद मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी ढोर जळगावच्या सरपंच रागिनी लांडे, कुसुम बडे, अनिता पाटेकर, संगीता कराड, रंजना अरगडे, मीना बडे, आशा फुंदे, मंगल नागरगोजे, मनीषा कोल्हे, आशा नागरगोजे, गिता कराड यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.