कोपरगावमध्ये वाळू तस्कर जोमात, अन महसुल यंञणा कोमात

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : तालुक्यात बेकायदा वाळू तस्करी करणारे जोमात जोमात आहेत तर तालुक्यातील पोलीस यंञणेसह संपूर्ण महसुली यंत्रणा कोमात गेल्यामुळेच आज तालुक्यात दिवस-राञ गोदावरी नदीपाञातून बेकायदा वाळू उपसा केला जातोय. वाळू तस्करी करणाऱ्यांना महसुली व पोलीस यंञणेतील बड्या अधिकाऱ्यांसह इतरांचे पाठबळ मिळाल्याशिवाय राजरोसपणे वाळू तस्करी होवूच शकत नाही. केवळ दिखाव्यासाठी थातूरमातूर कारवाई करून महसुलचे कर्मचारी आपलं काळ कृत्य झाकण्याचा प्रयत्न करता आहे, हे सुर्य प्रकाशा इतकं स्वच्छ दिसत नाही. 

 महसुल विभागाने कोपरगाव तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत. शासनाने पथकातील कर्मचाऱ्यांना सर्व सुविधांसह व्यवस्था केलेली असतानाही किमान पगारापुरती तरी प्रामाणिक काम करण्याऐवजी ते जाणुनबुजून डोळेझाक करतात. राञभर तालुक्यात बेकायदा  शेकडो गाड्या बेकायदा वाळू वाहतूक करताना सर्वसामान्य नागरीकांना सहज दिसतात पण महसुलच्या पथकांना का दिसत नाहीत.

मग जो मलीदा देईल त्याला बेकायदा वाळू वाहतुकीला परवानगी आणि जो देणार नाही त्यांच्यावर कारवाई करायची. असा प्रकार तर होत नसेल ना? कदाचित याच प्रकारामुळे वाळु तस्करांनी महसुलच्या यंञणेला धारेवर धरून उलट पक्षी शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी देण्याची पध्दत तालुक्यात रुजली आहे. 

 या पुर्वी वाळू तस्करीचे हाप्ते घेतल्याच्या कारणावरुन एका तत्कालीन तहसीलदाराला लाचलुचपतच्या जाळ्यात अडकावून निलंबित होण्याची वेळ आणली तेही एका वाळू तस्कराने. एका तत्कालीन महीला तहसिलदारा वाळू तस्कराने मारहाण करुन बेईज्ज केले होते. अनेकवेळा महसुलच्या कर्मचाऱ्यांनी वाळू तस्करांकडू धक्का बुक्की, दमदाटी, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी सहन करुन तालुक्यात बेकायदा वाळू उपसा सुरु ठेवला आहे.

अपवादात्मक काही वाळू तस्करावर कारवाई करण्यात आली माञ पुन्हा तेच वाळू तस्कर तेजीत वाळू उपसा करताना आढळून येतात पण महसुलचे कर्मचारी का शांत बसतात. एकंदरीत कोपरगाव तालुक्यात महसुल विभागाचे कर्मचारी वाळू तस्करांना मुकसहमती देतात म्हणूनच वाळू तस्कर जोमात आणि महसुली यंञणा कोमात आहे. 

 दरम्यान  ८ जूनच्या मध्यराञी वेळापूरच्या शिवारात एका ट्रॅक्टर मध्ये ५ हजार रूपयांची एकब्रास वाळू बेकायदा वाहतूक करताना महसुलच्या कर्मचाऱ्यांना दिसुन आला. त्यांनी तो ताब्यात घेतला. ताब्यातील ट्रॅक्टर कोपरगाव तहसीलकडे घेवून जात असताना कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यासमोर वाळू तस्करांनी महसुलच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत  गाडी आडवी लावून ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेला यावरून निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी कैलास देवराम कोळगे, आकाश मदने, सुनिल मेहेरखांब व इतर पाच इसमा विरोधात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये राञी उशिरा तक्रार दाखल केली.

त्यात त्यांनी म्हटले  की, महसुलचे कर्मचारी संकेत पवार व योगेश साळूंके यांना संबंधीत आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करीत दमदाटीने ताब्यातील पकडलेला ट्रॅक्टर  पळवून नेला आहे.  या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत. सदर घटनेतील सर्व आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.  पण वाळू तस्करांना बेकायदा वाळू करण्याची ताकद कोणामुळे मिळते यांचं आत्मपरीक्षण महसुलचे अधिकारी कर्मचारी करतील का?