श्रीगणेशच्या ९ विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.८ : आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक कृती वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा प्रतिष्टान, अहमदनगर संचलित सर डॉ सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येते.

या बालवैज्ञानिक परीक्षेत श्रीगणेश शैक्षणिक संकुलाच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर व सात विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला. यामध्ये अनुष डांगे व हर्षदा वाघे या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर अनुक्रमे  द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी यांनी दिली.

          याचबरोबर शिवांजली डांगे व साईशा डांगे यांनी तालुकास्तरावर प्रथम तर सिद्धी वहाडणे द्वितीय, भूमिका गमे व अथर्व चौधरी तृतीय, वेदिका चौधरी व तेजल दिघे यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला.

          या परीक्षेत राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था( इस्रो) च्या सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा ला भेट देण्याची संधी मिळते. यावेळी रॉकेट प्रक्षेपण, रॉकेट लॉन्चिंग पॅड, मिशन कंट्रोल युनिट, शास्त्रज्ञांशी संवाद व माहिती घेता येते.

सहलीसाठी  श्रीगणेश शैक्षणिक संकुलाच्या एकूण नऊ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य रामनाथ पाचोरे प्राचार्य पंकज खंडांगळे, विजय जगताप, आदिनाथ दहे, अनिता कुदळे, पर्यवेक्षक मंजुश्री गोर्डे, प्रवीण चाफेकर, दिपक गव्हाणे, निलेश देशमुख यांचे यशस्वी मार्गदर्शन लाभले.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, देवीदास दळवी, महावीर शिंगवी यांनी अभिनंदन केले आहे.