शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : भाजपा नेत्या पंकजा व धनंजय मुंढे यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामी कारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बोधेगाव पोलीस दुरक्षेत्रावर निवेदन देवून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
बोधेगाव परिसरातील सकल ओबीसी समाजाचे तरुण, कार्यकर्ते आणी विविध संघटनांचे पदाधिकारी येथील मुंढे चौकात जमा लेऊन यांच्या प्रतिमेला आभिवादन करून त्यांनी मुंढे साहेब अमर रहे, पंकजाताई जिंदाबाद, जातीय तेड निर्माण करणाऱ्या समाज कंटकावर कार्यवाही करा अशा घोषणा देत मोर्चा पोलीस दुरक्षेत्रावर धडकला. संबंधित समाजकंटांकावर कायदेशीर कारवाई करून कडक शासन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागण्याचे निवेदन दूरक्षेत्रचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर गर्जे यांना देण्यात आले.
यावेळी, माजी सरपंच रामजी अंधारे, वंचितच्या तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, लाडजळगावचे सरपंच अंबादास ढाकणे, ठाकूर पिंपळगावचे सरपंच संजय खेडकर, दिलीप खेडकर, महादेव दराडे, माणिक गर्जे, प्रकाश गर्जे, भीमा बनसोडे, भागवत भोसले, विठ्ठल वारकड, आदिनाथ मासाळकर, केशव खेडकर, आजिनाथ गर्जे, बाबा गिरी, भागवत शिंगाडे यांच्यासह बोधेगाव परिसरातील सकल ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.