ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केला सिद्धार्थ चव्हाणचा सत्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : वंचित बहुजन आघाडीचे  संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसापासून भटके विमुक्त ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषणास बसलेल्या ॲड. लक्षमण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली.

त्या नंतर ॲड. आंबेडकर यांनी शेवगाव मार्गे पुण्याकडे जाताना  प्रा. चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये पेटंट ऑफिसर म्हणून निवड  झालेल्या प्रा. चव्हाण यांचे चिरंजीव सिद्धार्थ याचा सत्कार करून त्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी भटक्या विमुक्तांचे नेते ॲड अरुण जाधव, बीड जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, परभणीचे ओबीसी नेते सुरेश फड, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, गोरख तुपविहिरे, राजू नाईक, सलीम जिलानी, लक्ष्मण मोरे उपस्थित होते.