धुळे जिल्हा टीडीएफचा विवेक कोल्हे यांना पाठिंबा

विवेक कोल्हे यांना वाढता पाठिंबा म्हणजे विरोधकांना धडकी भरवणारा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातचे अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे हे उमेदवारी करीत असून विवेक कोल्हे यांना मतदार संघातील पाचही जिल्ह्यांमध्ये टीडीएफ सह अनेक शिक्षक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. नुकताच धुळे येथील टीडीएफ संघटनेने कोल्हे यांना पाठिंबा दिलल्याने विरोधी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

 विवेक कोल्हे यांनी अवघ्या काही दिवसांत पाच जिल्ह्यांतील हजारो शिक्षकांपर्यंत पोहचुन आपलं राजकीय कौशल्य दाखवले आहे.  नुकतेच धुळे येथील टीडीएफ संघटनांच्या वतीने कोल्हे यांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रकात सचिव आर.आर. साळुंखे यांनी म्हटले आहे की, सुसंस्कृत, युवा व संघर्षमय नेतृत्वाचा वारसा असणारे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे नाशिक शिक्षक विभाग मतदार संघाची निवडणूक लढवत आहे. त्यांची विचारसरणी ही पीडीएफ च्या विचारसरणीची सुसंगत आहे.

सध्या शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या व शिक्षकांचे  प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यात मुख्यत्वे जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, नवीन शिक्षक भरती, शिक्षकांना दिली जाणारी शैक्षणिक कामे, संच मान्यता असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी एका सक्षम व अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची विवेक कोल्हे यांनी प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात म्हणजे जाहीरनाम्यात सांगितले आहे. त्यामुळेच धुळे जिल्हा पीडीएफ संघटनांच्या वतीने आपण त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असेही ते म्हणाले.

विवेक कोल्हे यांनी प्रचार यंत्रणा कमी कालावधीतच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचली आहे. टीडीएफ या महत्त्वाच्या संघटनांसह अनेक महत्त्वाच्या संघटनांनी कोल्हे यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा पाठिंबा  म्हणजे  विरोधकांना धडकी भरवणारा व कोल्हे यांच्या विजयाचे प्रतीक आहे. 

 अपक्ष असुनही विवेक कोल्हे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी  म्हणजे विरोधी उमेदवारांची बिघाडी करणारी दिसत आहे.