मुख्यमंञ्यांच्या समक्ष दाराडेंचा शिक्षकांना गुलाम करण्याचा प्रयत्न 

 शिक्षकांनी किशोर दराडेंचा केला निषेध 

 कोपरगाव  प्रतिनिधी दि. २४ : बुद्धीवादी सुज्ञ शिक्षक हे देशाची भावी पिढी घडवून देशाची खरी सेवा करत असतात. अशा सुज्ञ शिक्षकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी  सोडवल्या तर हे सर्व शिक्षक कायम गुलाम म्हणुन काम करतील असे वादग्रस्त एका कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री यांच्या समक्ष नाशिक शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी केले.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर आले असता दराडे यांनी हे वक्तव्य केले. विरोधकांसह अनेक शिक्षकांनी दराडे यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. दराडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष शिक्षकांना गुलाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलुन दाखवल्याने अनेकांनी दराडे यांचा निषेध व्यक्त केला. काही शिक्षकांनी आपली नाराजी व्यक्त करताना दराडे यांनी सुज्ञ शिक्षक मतदारांना मतदान करण्यासाठी कसे प्रलोभने दिली याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केली.

 सत्ता येते जाते. शिक्षक हा कायम राजा असतो. शिक्षकांचा आदर करण्याची आपली परंपरा आहे. माञ  दराडे यांनी शिक्षकांना गुलाम म्हणुन संबोधले यावरून दराडे यांच्या चेहऱ्यावरील सज्जनपणाचा मुखवटा गळुन पडला आहे. त्यांची संस्कृती व भूमिका यातुन स्पष्ट दिसते.असे मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त करीत दराडे यांच्यावर निशाणा साधला. 

उध्दव ठाकरे सेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर दराडे यांनी पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची जोरदार चर्चा आहे. केवळ पैसेच नाही तर  शिक्षकांना सफारी शिवायला कपडा, त्यांच्या पत्नीला पैठणी आणि नाकात घालायला सोनेरी नथ वाटल्या तसेच इतर काही उमेदवारांनी जेवणावळी दिल्याची  माहीती  समाजसेवक व थोर अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शिक्षकांच्या समस्यांवर बोलण्या ऐवजी केवळ शिक्षकांना मतदानापुरते आकर्षीत करून त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये असे म्हणत कुलकर्णी यांनी निषेध व्यक्त केला.

 यावेळी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनीही किशोर दराडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना म्हणाले की, शिक्षक मतदार संघ हा सुज्ञ मतदारांचा आहे. शिक्षकांना गुलाम करण्याचा विरोधकांचा  प्रयत्न आहे परंतु  आई-वडिल आणि शिक्षक हे देशाची पिढी घडवणारे आहेत. शिक्षकांना गुलाम करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. शिक्षकांच्या पाठिमागे सक्षमपणे उभे राहुन त्यांच्या समस्या सोडवले पाहीजेत. शिक्षकांना गुलाम करण्याची भाषा दराडे यांनी वापरली त्यांचा  मी निषेध करतो.

मुख्यमंञ्यांनी शिक्षकांसाठी खुप काम केले. १ हजार १६० कोटी दिले. शिक्षकांच्या चुली पेटल्या धाडशी निर्णय घेतला. मराठी जशी वळवावी तशी वळते माझ्या बोलण्याचा हेतू वेगळा होता. कोणीही गैरसमज करुन नये, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढण्यात आला. अशी प्रतिक्रिया आमदार दराडे यांनी माध्यमांना दिली. 

शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे सेवक म्हणून काम केले पाहीजे परंतु आमदार दराडे यांनी गेल्या सहा वर्षांत शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका जबाबदार व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या समोर असे बोलणे योग्य नाही. दराडे यांनी शिक्षकांसाठी काम केले असते तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी येण्याची वेळ आली नसती. दराडे यांनी त्यांच्या शिक्षक संस्थेत १९ वर्षांचा शिक्षक मतदार केले, ७५ वर्षांचा शिक्षक तिथे मतदार आहे. ९ वी पास पासुन ते थेट शेतमजूर सुध्दा शिक्षक मतदार केल्याचा आरोप नाशिक शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी थेट दराडे यांचे नाव घेवून केला.

याचे सर्व पुरावे आपल्याकडे असुन लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे कोल्हे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ते पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या समस्यांचा डोंगर  माझ्या समोर आहे त्यामुळे  या निवडणुकीत विरोधकांचे आव्हान मला काहीच वाटत नाही. सध्या  महायुती व महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने शिक्षक एकजुटीने माझ्या पाठीमागे आहेत. या निवडणुकीत शिक्षकांच्या सन्मानाचा व सत्त्याचा विजय होणार आहे असेही ते म्हणाले. 

किशोर दराडे हे शिक्षक नसल्याने त्यांनी शिक्षकांबद्दल गुलाम हा शब्द वापरला. दरांडेंनी शिक्षकांना मानसन्मान दिला असता तर त्यांच्या मुखातुन गुलामगिरीची भाषा आली नसती. जे पोटात आहे ते ओठात येते. शिक्षकांच्या प्रश्नासाठी अनेक दिवस आझाद मैदानावर उपोषणे केली तेव्हा कुणीही तिकडे फिरकले नाही आता मतांसाठी साड्या नथ, पैठणी, सफारी पैशाख वाटणाऱ्या,  जेवणावळी देणाऱ्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवाव्यात असे म्हणत शिक्षक मतदार संघाचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांनी दराडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 

 दरम्यान नाशिक शिक्षक मतदार संघाची हि निवडणुक दुरंगी वाटत असताना विवेक कोल्हे यांच्यामुळे तिरंगी झाली आहे. सरळ व सोपी वाटणारी ही निवडणुक  शेवटच्या टप्प्यात अटीतटीची झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

  विवेक कोल्हे यांना आमदार करण्यासाठी कोपरगावसह नगर- नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते एकवटुन प्रचार करीत आहेत.  जर कोल्हे आमदार झाले तर कोपरगाव तालुक्याला दोन आमदार होण्याचा मान पुन्हा एकदा मिळू शकतो.