श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात जागतिक आॕलिपिक दिन संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : आॕलिम्पिक स्पर्धे मध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने खेळाचा ध्यास घेणे गरजेचे आहे असे मत आंतरराष्ट्रीय फुटबॉल पटू पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी व्यक्त केले. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत जागतिक आॕलिपिक दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शंखवाळकर बोलत होते. यावेळी त्यांचे समवेत टोकिओ ऑलिंपिक निरिक्षक अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके उपस्थित होते.
शंखवाळकर पुढे म्हणाले की, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरिल होणाऱ्या क्रीडा स्पर्धात सहभागी होण्यासाठी भरपुर मेहनत घ्यावी. सातत्याने मैदानाचा ध्यास घेतला पाहीजे तरच विदयार्थी यात सहभागी होईल व त्याचा सर्वांगिण विकास होईल. आॕलिम्पिक स्पर्धाची माहीती त्यांनी देवुन ते पुढे म्हणाले की, खेळाडुंनी आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दीलीप कुमार अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, आनंद ठोळे, डाॕ.अमोल अजमेरे, राजेश ठोळे आदीनी जागतिक आॕलिम्पिक दिना निमित्त सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक निलेश बडजाते यांनी तर आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक अनिल काले, अनिल अमृतकर, दीलीप कुडके, अतुल कोताडे, रघुनाथ लकारे, रेवती तुपकर, कल्पना महानुभाव आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.