शेवगावात आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : दलित समाजाच्या भावना दुखावतील अशा आशयाचे प्रत्रक काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा तसेच या घटनेत त्याला मदत करणारांचा पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्यांचे वर कठोर कारवाई करण्याच्या मागणी साठी शेवगाव शहरासह तालुक्यातील विविध पक्षिय संघटनांच्या वतीने येथील क्रांती चौकात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करुन जोरदार घोषणबाजी करण्यात आली.

 या आंदोलनानंतर शेवगाव पोलिसांनी आंदोलकांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन, वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासहेब  धाकतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

भकापचे कॉ. संजय भगवान नांगरे, वंचितचे किसन जगन्नाथ चव्हाण, प्यारेलाल शेख, माजी नगरसेवक कैलास तिजोरे, प्रवीण भारस्कर,  पंडित भोसले,  पवन कुमार साळवे, अरुण लांडे, गोरख वाघमारे, राहुल सावंत, ताहेर पटेल, गणेश हनवते, सुभाष लांडे यांच्यासह इतर दहा ते पंधरा इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.