कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोशिएशन व लातुर जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वी महाराष्ट्र वरिष्ठ गट बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२३ लातुर येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत अहमदनगर जिल्हा बेसबॉल असोशिएशनचा संघ सहभागी होणार आहे. त्याकरिता दि. २९ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ गट पुरुष व महीला निवड चाचणी व स्पर्धा के. बी. पी. विद्यालय स्टेशन रोड कोपरगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्व बेसबॉल खेळाडू मार्गदर्शकांनी दि. २९ऑक्टोबर रविवार सकाळी ठीक ९.०० वाजता के. बी. विद्यालयाच्या मैदानावर कीटसह उपस्थित राहावे. असे आवाहन अहमदनगर जिल्हा बेसबॉल असोशिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे, उपाध्यक्ष सुधिर चपळगावकर, सचिव मकरंद को-हाळकर यांनी केले. अधिक माहितीसाठी संपर्क- मकरंद को-हाळकर-९४०३९२३०६२, प्रा. सुनिल कुटे-९६०४०४०३८३