कोपरगाव महसूल प्रशासनाने रेशन कार्डचे योग्य ते नियोजन करावे – नितीन शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ : रेशनकार्ड अथवा शिधापत्रिका म्हणजे रास्त दरात जीवनश्यक वस्तू मिळण्यासाठी सार्वजनिक वितरण योजना मार्फत पुरवण्यात येणारी व्यवस्था. नवीन रेशन कार्ड, नुतनीकरण, फाटलेले, जीर्ण, गहाळ झालेले बदलून देणे तसेच नवीन नाव समाविष्ट अथवा कमी करण्यासाठी सामान्य माणसाला आव्हानात्मक वाटतात.

रेशनकार्ड हे ओळखपत्रा साठी लागणारं प्राथमिक डॉक्युमेंट आहे. पंरतु महसूल, सेतू कार्यालय व ग्रामपंचायत पातळीवर ह्या बाबतीत व्यवस्थित मार्गदर्शन केले जात नाही. नागरिकांची पिळवणूक होत आहे, सदर कामासाठी अवास्तव पैश्याची मागणी केली जात आहे. 

सामान्य जनता दिवस दिवस तहसील कार्यालयात चकरा मारतात. काही लोक परगावी राहतात दिवस व येण्या जाण्याचा खर्च वाचवण्यासाठी आर्थिक तडजोड करतात, वास्तविक पाहता वरील कामासाठी आॅनलाईन कोठेही संगणकना वर हे काम करता येते असे सांगण्यात येते आहे. लोकप्रतिनिधी सासंद, आमदार व माजी आमदार यांनी लक्ष घालावे व जनतेची लुट थांबवावी. 

तहसील कचेरी मध्ये रेशन कार्ड दुरस्ती बाबतीतचे मदत केंद्र अथवा मार्गदर्शन बुथ कार्यान्वित करण्यात यावं जेणेकरून सामान्य माणसाची पिळवणूक होणार नाही.