संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जॉनसन कंट्रोल्समध्ये निवड  – अमित कोल्हे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने जॉनसन कंट्रोल्स या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजीत करण्यात आला होता. यात कंपनीने अंतिम वर्षाच्या सहा विद्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू. पाच लाखांवर निवड केली आहे.

Mypage

चालु वर्षाची ही दमदार सुरूवात झाली असुन पाहीजे त्या विद्यार्थ्याला संस्थेचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने प्रयत्न असतो, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Mypage

पत्रकात कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, जॉनसन कंट्रोल्स ही अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनी असुन मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग क्षेत्रातील उत्पादने, त्यांची सुरक्षा, दुरूस्ती, इत्यादी क्षेत्रात आघाडीची कंपनी अहे. अशा नामवंत कंपनीमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा नोकरीच्या माध्यमातुन प्रवेश  झाला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अलोक अरविंद पांडे, प्रतिक जयराम पाटील, साक्षी राजेंद्र वालझडे, राहुल लक्ष्मण सोमवंशी, ऋषिकेश अर्जुनसिंग राजपुत व देवयांनी सुर्यकांत निकम यांचा समावेश आहे.

Mypage

माजी मंत्री व संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील मुलं-मुली स्वावलंबी झाली पाहीजे हे स्वप्न ४० वर्षांपूर्वी पाहीले होते. दरवर्षी  शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळत असल्याने ग्रामीण कुटूबांना आधार मिळत आहे. या विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या उपलब्धीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले आहे.

Mypage

तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉॅ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. विशाल  तिडके, विभाग प्रमुख डॉ. दिपेश परदेशी व डॉ. प्रसाद पटारे उपस्थित होते.

Mypage