शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : शेवगावातील विविध शाळा महाविद्यालयातील एसएससी व एचएससी परीक्षेत विशेष गुणवत्ता धारक गुणवंत मुला मुलींना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे कौतुक व्हावे या हेतूने श्री रेणुका माता मल्टीस्टेट को ऑप.अर्बन क्रेडीट सोसायटी लि. या संस्थेच्या शेवगाव शाखेच्या वतीने ‘ गुणगौरव’ समारंभाचे आयोजन करून शुक्रवारी दिडशे मुलामुलींना त्यांच्या पालक व गुरुजनांसह सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांच्या संकल्पनेतून देशातील अग्रगण्य असलेली श्रीरेणुका माता मल्टीस्टेट अर्बन क्रेडीट सोसायटी लि. या संस्थेच्या ९ राज्यातील १३८ शाखा मधून वरचेवर अनेक स्तुत्य उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून भारदे शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी हरीष भारदे, संस्थेचे सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे, प्रा .जनार्दन लांडे पाटील, शाखाधिकारी मिना गाढे यांचे हस्ते या वर्षीच्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंताना . स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र, आरती संग्रह, संस्थेचे माहिती पत्रक व गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी आलेल्या पालक व गुरुजनांना शाल, श्रीफळ, श्री रेणुकामाता फोटो फ्रेम, संस्थेचे बुकलेट व आरती पुस्तक भेट देण्यात आले. चहापाना नंतर या गुणगौरव सोहळ्याची सांगाता झाली. यावेळी बाबासाहेब दुर्गे, संजय कुसारे या गुरुजनांनी संस्थेच्या या स्तुत उपक्रमा बद्दल कौतूक करून आभार व्यक्त केले. हा सोहळा यशश्वी करण्यासाठी माधवी कसबे, स्मृती भाडाईत, गणेश सुरवसे, ज्ञानेश्वर झिरपे, राजेंद्र सराफ यांनी विशेष परिश्रम घेतले.