नाशिक शिक्षक मतदारसंघात कांटे की टक्कर, विवेक कोल्हेंचे तगडे आव्हान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ :  आज सकाळपासून विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी शहरातील अंबड येथील वेअर हाऊसमध्ये सुरु आहे. ३० टेबलवर ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे १८० कर्मचारी मतमोजणी करत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पहिल्या फेरीतील मतपत्रिकांची मोजणी सुरु करण्यात आली आहे. मतमोजणीच्या सुरूवातीला नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी काही वेळ गोंधळ झाला यावेळी  शिवसेनेने मतमोजणी वर आक्षेप घेतला. 

पहिल्या फेरीत ३० हजार मतपत्रिकांची मोजणी सुरू असून त्यातील वैद्य मते प्रत्येक उमेदवाराच्या बॉक्समध्ये टाकून वेगवेगळी केली जात आहेत. तसेच अवैध मतांची देखील मतमोजणी करण्यात येत आहे. तर दुसऱ्या फेरीत ३४ हजार ८५३ मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. यानंतर अवैध मतांची मोजणी करून कोटा ठरवला जाणार असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने उमेदवारांची मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे या  मतमोजणी प्रक्रियेला राञी उशिरा पर्यंत बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे एकमेकांची मते बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. मराठी अक्षरात १ आकडा काढला असेल तर त्याला इंग्रजी 9 समजून घेऊन त्यावर उमेदवारांकडून आक्षेप घेतला जात आहे. तसेच उमेदवारांचा एकमेकांच्या मतपत्रिकेतील हस्ताक्षरातील चूका शोधून मत बाद ठरविण्याकडे कल दिसत असून आक्षेप घेतलेली मते डाऊटफुल बॉक्समध्ये टाकली जात आहेत. याशिवाय ज्या मतांवर आक्षेप आहे त्यासंदर्भातील निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेणार आहेत.

दरम्यान, पहिल्या फेरीच्या ३० हजार मतपत्रिकांच्या मोजणीत महायुतीचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या नावापुढे ठेवण्यात आलेल्या मतांची संख्या मोठी असल्याने या तिघांमध्ये ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांची लीड तोडताना दिसत आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची मते मोजून रात्री उशिरापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. या मतदानात शिक्षित गुरुजींचा अशिक्षितपणा पुन्हा चव्हाट्यावर आला. 

पहिल्या फेरीच्या मोजणीमध्ये अवैध मतांमध्ये एक चिठ्ठी आढळून ती बाद करण्यात आली बहुतांश  बात होणाऱ्या मतांच्या पत्रिकेंवर अनेक ठिकाणी स्वतःच्या पेनाने निशाणी करणे, एकच क्रमांक दोन जणांना देणे बरोबरची निशाणी करणे अथवा स्वाक्षरी करणे असले प्रकार शिक्षक मतदारांनी केली आहे. वेळोवेळी सूचना देऊनही निवडणूक निर्णय अधिकारी दिलेल्या पेनानेच क्रमांक देण्याची सूचना असतानाही सुशिक्षित  शिक्षकांनी अशिक्षितपणा करत चुका केल्याने मतपत्रिका बाद ठरल्या आहेत.

 पहील्या फेरीत ३० हजार मतपत्रिका मोजण्यात आल्या त्यात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे  हे १७७५ मतांनी आघाडीवर असुन  पहील्या पसंतीची मिळाले मते पुढील प्रमाणे. किशोर दराडे – १११४५, विवेक कोल्हे – ९३७०, डॉ. संदीप गुळवे – ७०८८ असे आहे. माञ हि निवडणूक अतिशय चुरशीची असल्याने कोण निवडून येणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी महायुती व महाविकास आघाडीच्या  दोन्ही उमेदवारांना घाम फोडला आहे.  

…चौकट..

 मतपञीका ज्यादा झालेल्या मतदानापेक्षा काही ठिकाणी अधिक मतपत्रिका आढळून आल्याने हि निवडणूक चर्चेची झाली आहे. येवला, निफाड व चोपडा येथे मतपेटीत सापडलेल्या ज्यादा मतपत्रिका स्वतंत्र ठेवण्यात आले असून मतांच्या फरकामध्ये मोठी तफावत असल्यास त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. मात्र अटीतटीची असल्यास त्याचा विचार केला जाईल असे बोलले जात आहे.