संजीवनीच्या २२ अभियंत्यांची वेस्को डीजिटल इनोवेशन सेंटरमध्ये निवड

     कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : कंपन्यांच्या संपर्कात राहुन कंपन्यांना काय ज्ञान असलेले अभियंते हवे आहेत, ते ज्ञान विभाग निहाय आपल्या विद्यार्थ्यांना अवगत करणे, कंपन्यांचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव आयोजीत करणे, आपल्या विद्यार्थ्यांच्या सराव मुलाखती आयोजीत करून त्यांची कंपनी नोकरीसाठी निवड करेलच, अशा आत्मविश्वासापर्यंत  घेवुन जाणे, इत्यादी कामे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागामार्फत अव्याहत चालु असतात.

याचिच फल निष्पत्ती  म्हणुन अलिकडेच वेस्को डीजिटल इनोवेशन सेंटरने कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागातील अंतिम वर्षाच्या तब्बल २२ नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी आकर्षक वार्षिक पॅकेज देवुन नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे, अशा  पध्दतीने टी अँड  पी विभागाची दमदार वाटचाल सुरू असल्यांची माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की वेस्को डीजिटल इनोवेशन सेंटरने यश अशोक  चव्हाण, यश अरविंद गिरमे, श्रीकांत मच्छिंद्र इल्हे, श्रुती देविदास नवगिरे, इशिका  सचिन नारखेडे, शिवम शामकांत सुरादे,अश्विनी अशोक म्हस्के, चिन्मय संजय सदाफळ, जतिन रविंद्र बोरा, शेखर विष्णू  भिडे, तेजस दिलीप नागरे, यश  प्रमोद ढगे, प्रणव पदमाकर ढगे, सौरभ कल्याण होन, दिपज्योत दिलीप जपे, आकांक्षा द्वारकानाथ होनमानसी संजीव नाकोड, वैष्णवी  संजय पंडूरे, पार्थ भारत पानगव्हाणे, साहिल भिमराज सोनवणे, संकेत संपत कोल्हे व अनिकेत मुरलीधर वाकचौरे यांची निवड केली आहे.

          संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर व डीन टी अँड  पी डॉ. विशाल  तिडके यांचे अभिनंदन केले आहे.

  मी राहाता येथिल रहिवासी असुन माझे वडील शेती करतात. मला नोकरी मिळणारच या आत्मविश्वासाने   मी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये प्रवेश  घेतला. इंडस्ट्रीला ज्या आधुनिक सॉफ्टवेअर्सचे ज्ञान आवश्यक  असते, त्यांचा अंतर्भाव आमच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. आमच्या कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे हे शक्य झाले. तसेच टी अँड  पी विभगानेही आमच्या भरपुर सराव मुलाखती घेतल्या.त्यामुळे माझी या कंपनीत सहज निवड झाली आणि माझे व माझ्या  आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले.-नवोदित अभियंता चिन्मय सदाफळ