कोपरगाव मतदारसंघातील नऊ रस्त्यांचे भाग्य उजळणार – आमदार काळे

२४.८४ कोटीच्या निविदा प्रसिद्ध

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. ११ : मागील साडे चार वर्षात रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना रस्ते विकासासाठी तब्बल ४७० कोटीचा निधी आणला असून दळणवळणाच्या दृष्टीने बहुतांश सर्वच प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित मंजूर असलेल्या रस्त्यांच्या निधीची कामे लवकरात लवकर सुरु होवून रस्त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघातील महत्वाच्या नऊ रस्त्यांच्या कामाच्या २४.८४ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे मतदार संघातील इतर रस्त्यांप्रमाणे या नऊ रस्त्यांचे देखील भाग्य उजळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

यामध्ये रा.मा. ७ ते धामोरी, बोलका, खोपडी रस्ता (प्रजिमा ४) मध्ये बोलकी करंजी रस्त्यामध्ये सुधारणा करणे. (२.६४ कोटी), रा.मा. ७ ते माहेगाव देशमुख रस्ता (ग्रा.मा.३०) मध्ये सुधारणा करणे (१.११ कोटी), नाशिक जिल्हा हद्द ते रा.मा. ६५ पोहेगाव, सावळीविहीर रस्ता (प्रजिमा ९८) मध्ये सोनेवाडी ते तालुका हद्द रस्ता सुधारणा करणे. (२.२८ कोटी,) रा.मा. ७ ते धामोरी ब्राह्मणगाव, पढेगाव, बोलका, खोपडी रस्ता (प्रजिमा ४) मध्ये दहेगाव ते लौकी रस्त्यामध्ये सुधारणा करणे (२.२६ कोटी), तोलारखिंड, कोतूळ, वैजापूर रस्ता (रा.मा. ६५) मध्ये शिरसगाव ते उक्कडगाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे. (३.८९ कोटी),

रा.म.मा. ८ ते सावळीविहीर, वारी औरंगाबाद जिल्हा हद्द रस्ता (प्रजिमा२०३) मध्ये सडे बारहाते वस्ती ते वारी रस्ता सुधारणा करणे. (३.७१ कोटी), अंचलगाव, ओगदी, शिरसगाव रस्ता (प्रजिमा १३) मध्ये ओगदी ते शिरसगाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे. (२.९७ कोटी), प्रजिमा ४ ते ब्राह्मणगाव, टाकळी, कोपरगाव, कोकमठाण, सडे, शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) मध्ये कोकमठाण ते सड़े रस्त्यामध्ये सुधारणा करणे (२.९९ कोटी), प्रजिमा ४ ते ब्राह्मणगाव, टाकळी, कोपरगाव, कोकमठाण, सडे, शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) मध्ये ब्राह्मणगाव ते खडकी (जुना टाकळी नाका) रस्त्यामध्ये सुधारणा करणे (२.९९ कोटी) य रस्त्यांचा समावेश असून लवकरच हे रस्ते चकाचक होणार आहे.

कोपरगाव शहरासह मतदार संघातील सर्वच प्रमुख जिल्हा मार्गासह ग्रामीण भागातील रस्ते विकासाचे मोठे आवाहन स्वीकारून आ.आशुतोष काळे यांनी मागील साडे चार वर्षात कोपरगाव शहरासह मतदार संघाचा रस्त्यांच्या बाबतीत चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. मतदार संघातील रस्त्यांबरोबरच पाणी, आरोग्य, जन सुविधा, तीर्थक्षेत्र विकास असे सर्वच विकासाचे प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे विकसित मतदार संघ म्हणून कोपरगाव मतदार संघाची जिल्ह्यात नव्हे तर राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

मतदार संघाच्या विकासाला ज्याप्रमाणे निधी मिळविण्यात आ. आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत.  निधी मिळविण्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा व जोपर्यंत निधी  मिळत नाही तोपर्यंत पिच्छा धरण्याचा असणारा आ.आशुतोष काळे यांचा  स्वभावगुण पाहता यापुढे देखील विकासाच्या कामांचा तडाखा असाच सुरु राहणार आहे.