सकारात्मक बदल घडवण्यासाठी महिलांनी स्वावलंबी व्हावे – रसाळ

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवली आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी शाळकरी विद्यार्थिनीनी विविध अडथळे पार पाडण्याचे कौशल्य विकसित केले पाहिजे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कष्ट करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका राजश्री रसाळ यांनी केले. येथील निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालया विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेल्या सबलीकरण कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

प्रा .सोनाली आसने यांनी विद्याथिनी मध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य कौशल्य विकसीत करून त्यांना समाजात समानता, अन्याय यासाठी लढण्यास प्रेरित करणे तसेच महिलांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत करून आर्थिक स्वावलंबन कसे मिळवायचे, छळ आणि भेदभावाशी प्रसंगी लढाई करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा कार्यशाळेचा उद्देश असल्याच सांगितले.

    प्राचार्य डॉ .पी ए दुकळे यांनी विद्यार्थिनींना सशक्त बनविण्यासाठी आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी कार्यशाळा आवश्यक असल्याचे सांगितले.
   यावेळी विद्यार्थिनी साठी प्रश्नमंजूषा कार्यक्रम घेण्यात आला. रीता धिवर यांनी सुत्रसंचलन केले. दिपाली गरड यांनी आभार मानले.