डहाळे यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Mypage

शेवगाव प्रतिनिधी दि.२६ :  शिवसेना शेवगाव तालुकाप्रमुख (शिंदे गट )आशुतोष डहाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचेकडे एका सविस्तर निवेदनाद्वारे शेवगाव नगरपरिषदेस अग्निशामक वाहनाची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने त्वरित दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी महेंद्र दळवी यांचे सहीने शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना त्वरित विना विलब प्रस्ताव सादर करण्याच्या गाईड लाईन दिल्या आहेत.

Mypage

या आदेशात म्हटले आहे की, डहाळे यांनी मागणी केल्या अनुषंगाने संदर्भाधीन दि.३१/८/२००९, दि.१२/३/२०२१ व दि.१ /१२/२०२३  रोजीच्या शासन निर्णयातील महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियानात योजना अंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार तपासणी करून आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनलय मुंबई यांचे मार्फत शासनास विना विलंब सादर करावा. असे आदेश करण्यात आले आहेत.

tml> Mypage

या संदर्भात डहाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवगाव शहराची सुमारे ५५ हजारावर लोकसंख्या असून शहरात लगत चारही बाजूस मोठाले उद्योग आहेत विविध व्यवसायाच्या दृष्टीने बाजारपेठ मोठी आहे. गेल्या दहा पंधरा वर्षापासून विविध ठिकाणी अग्नी तांडव झाल्याच्या दुर्घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यावेळी मोठे आर्थिक नुकसान झाले. यासंदर्भात अग्निशामक वाहन नगरपरिषदेने उपलब्ध करावे.

Mypage

अशी मागणी वेळोवेळी केली आहे. तसेच जनतेकडून नगरपरिषद अग्निशामक वाहनाचा कर वसूल करून देखील काहीही कारवाई झाली नाही. तरी या बाबी विचारात घेऊन नगरपरिषदे स. अग्निशामक वाहनाची मंजुरी द्यावी व त्याबाबत उचित आदेश देण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली होती.

Mypage

याआदेशाचे पत्र कक्ष अधिकारी नगर विकास विभाग महेंद्र दळवी यांचे सही निशी डहाळे यांना तसेच संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय मुंबई यांना पाठवण्यात आले आहे. 

Mypage