पावसा अभावी पिके धोक्यात, मागील वर्षीचे नुकसानीचे अनुदान त्वरित मिळावे अन्यथा आंदोलनाचा ईशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०३ : शेवगाव तालुक्यात अद्याप देखील पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. तालुक्यातील एरंडगाव, ढोरजळगाव मंडळात तर पावसाचे अधिक कमी प्रमाण आहे. अनेक भागात खरीप पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. कापूस तुर बाजरी या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत खते व बियाणे वाटप करण्यात यावीत.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मागील पावसाळ्यातील सन २०२२ – २०२३ सालचे अतिवृष्टीचे व सततच्या पावसामुळे झालेल्या, नुकसानीचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. संबंधित शेतकऱ्यांना हे अनुदान त्वरित मिळावे. आदि मागण्यांच्या पाठपुराव्याचे निवेदन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसिलदार, प्रशांत सांगडे यांना गुरुवारी देण्यात आले. याबाबत दिरंगाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुका अध्यक्ष कैलास नेमाने, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, पंडितराव भोसले, नानासाहेब मडके, हनुमान पातकळ, अशोक धस, राहुल बेडके, जाकीर कुरेशी, अश्फाक पठाण, बप्पासाहेब कराळे, अर्जुन मडके, रामनाथ लेंडाळ आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती