कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आरोग्य जनजागृती 

 कोपरगाव प्रतिनिधी दि. १३ :  कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आरोग्य जनजागृती करुन पावसाळ्यामध्ये संसर्ग रोगराई पासुन बचाव करण्यासाठी शाळा महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी जावून जनजागृती करण्याची मोहीम राबवण्यात आले. 

जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य  साधून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय निरीक्षक सचिन जोशी, आरोग्य कर्मचारी शशिकांत भैसाने, ज्ञानेश्वर कानडे, प्रकाश दवणे, मनोज शिवदे, प्रकाश लोखंडे यांच्या पथकाने शहरातील केबीपी विद्यालयातील विद्यार्थ्यांना हिवताप व डेंगू आजाराबाबत आरोग्य विभागाच्या  पथकाने आरोग्य  खास प्रशिक्षण देत प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती करण्यात आले.

यावेळी  डासांपासुन होणारे आजारी आणि डासांपासून कसा बचाव करायचा. आपला परीसर कसा डासमुक्त करावे, डासांचा नायनाट करण्यासाठी गप्पी मासे काय कार्य करतात याचे प्रात्यक्षिक सचिन जोशी व त्यांचे सहकारी यांनी गप्पी मासे, डासांच्या आळी, हस्त पत्रिका, पोस्टर्स इत्यादी साहित्यासह माहीती देत जनजागृती  केली.

यावेळी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे के.बी.पी. विद्यालय येथे कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोपरगाव अर्बनचे हिवताप कर्मचारी तसेच आरोग्य निरीक्षक, विद्यालयाचे मुख्याध्यापिका काशिबाई जगताप, शहाजी सातव, सहशिक्षक संभाजी आहीरे,  व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केले.

जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यात भरपुर पाऊस असतो. कीटकजन्य व जलजन्य आजाराबाबत जनजागृती आरोग्य विभागाच्यावतीने विविध शाळेत हे उपक्रम राबविले जात आहेत यानिमित्त कोपरगाव शहरातील जनतेला आव्हान करण्यात येत आहे की, “स्वच्छता पाळा व आपला परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा ,” या मोहिमेत नगरपालिकेचे सहकार्य आम्हाला लाभत आहे तसेच मत डॉ. गिरीश गुट्टे यांनी केले.

कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयांची आम्हाला सहकार्य  लाभते त्यामुळे कोपरगाव शहरात कुठलीही साथ उद्भवणार नाही याची दक्षता वैद्यकीय  विभागाच्यावतीने घेण्यात येते. तसेच परिपूर्ण लक्ष ठेवून आहोत तेव्हा नागरीकांनी सतर्कता बाळगुन आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन डॉ.गुट्टे यांनी नागरीकांना केले आहे.  कार्यक्रमाचे सुञसंचलन मनिषा पाटील यांनी केले.