विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा – राजेंद्र चौधरी 

कोपरगाव येथे शिवसेना सभासद नोंदणी अभियान शिबिर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. या योजनेतून महिलांना लाभ मिळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त फार्म भरून घेतले पाहिजे. शिर्डी लोकसभा मतदार संघात झालेल्या पराभवाला खचून न जाता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्या आदेशाचे आपण काटेकोरपणे पालन करायचे आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने उभे रहा असे आवाहन शिर्डी लोकसभेचे निरीक्षक राजेंद्र चौधरी यांनी केले. 

कोपरगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या सुचनेनुसार कोपरगाव तालुका व कोपरगाव शहर शिवसेना सभासद नोंदणीला सुरुवात झाली. या कार्यक्रमात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राजेंद्र चौधरी बोलत होते. पोहेगांव नागरी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे विजय काळे होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख भगीरथ होन, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, मीनाक्षीताई वाकचौरे,आरती गाढे,बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, सर्जेराव कदम,  शिवसेना तालुकाप्रमुख संजय गुरसळ, भाऊसाहेब थोरात, जिल्हा संघटक शिवाजी जाधव, अक्षय जाधव, अभिषेक आव्हाड, सरपंच अमोल औताडे, मनोज राठोड ,प्रशांत रोहमारे, रवीद्र औताडे, घनश्याम वारकर ,कैलास आसणे ,जालिंदर कांडेकर, अनिल होन,प्रभाकर होन, दादाभाई सय्यद,अशोक म्हाळसकर,हौसीराम पाडेकर,शरद घारे, दत्तात्रय भालेराव आदी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जे काम केले. त्या कामाची माहिती आपण जनतेसमोर मांडली पाहिजे. शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घटक पक्षातील नेत्यांनी मदत केली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. यापुढे त्यांच्या भरोशावर न राहता आपण तयारी सुरू केली पाहिजे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता गावागावात मंडप लावून बसलेले लोकसभेच्या निवडणुकीत घरातून बाहेर निघाले नाही. त्यांच्याकडून लोकसभेसाठी देखील अशाच पद्धतीने मंडप लावणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही. शिवसेना सभासद नोंदणी अभियान सुरू झाले आहे. जास्तीत जास्त सभासद नोंदणी होण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक रावसाहेब थोरात यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब रहाणे यांनी केले तर आभार भगिरथ होन यांनी मानले.