घरबसल्या भरा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म – आमदार राजळे

शेवगांव प्रतिनिधी, दि. १५ : महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी २१ -६० वयोगटातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू करणाण्यात आली, योजना सुरू झाल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेवुन शासन स्तरावरून योजना सुटसुटीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, आता आपण अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत, सेतु सुविधा केंद्र तसेच आपण आपल्या घरी मोबाईल ॲप द्वारे फार्म भरू शकतो अशी माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलाना मिळावा म्हणून तालुक्यातील मळेगावच्या मळगंगा देवी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या विशेष शिबीरात त्या बोलत होत्या. यावेळी तहलिसदार प्रशांत सांगडे यांनी स्वत:च्या मोबाईल द्वारे मनिषा संदीप पंडीत यांना ५ मिनीटांत ऑनलाईन फार्म भरत प्रात्याक्षिक दाखवले.

   आमदार राजळे म्हणाल्या,  व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये  ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क संदर्भातील  शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे, राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, याचा फायदा राज्यातील ५६ लाख हून अधिक कुटुंबाना होणार आहे.

महाराष्ट्राचे संवेदनशील महायुती शासन आपल्या बहिणीला रक्षाबंधणाचे औचित्य साधुन जुलै ऑगस्ट महिन्याची रक्कम एकत्रित देणार आहेत. ही योजना’ जास्तीत जास्त सुलभ करण्यासाठी शासनाचा प्रयत्न असुन ३१ ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली असली तरी योजना पुढे निरंतर चालु राहणार असल्याचे आ. राजळे यांनी  सांगितले.

यावेळी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडधे, कचरू चोथे, शिवाजीराव भिसे, विठ्ठल आरेकर, सचिन कोळगे, सोमनाथ कळमकर, ज्ञानेश्वर उगले, रविंद्र राशिनकर, हनुमान बडे, भिमराज नवल, संभाजी आडसरे, नवनाथ साबळे, योगेश नवल, गोवर्धन नेमाणे, भागचंद सातपुते, मनोज फरताळे, सुनिल नांगरे, महादेव नांगरे, काकासाहेब फरताळे, कचरू निकम, राजु निकम, हरिभाऊ नवल, ऋषी पंडीत, सचिन निकम आदी उपस्थित होते.  भाऊसाहेब वाणी यांनी सुत्र संचलन केले तर शिवाजी भिसे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.