शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : मुली कोणत्याच क्षेत्रात मुलापेक्षा कमी नसतात. उलट अनेक क्षेत्रात त्या आघाडीवर असतात. हे सिद्ध झाले असल्याचे प्रतिपादन तालुक्यातील मंगरूळ खुर्द येथील निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर उबाळे यांनी केले. या वर्षीच्या एसएससी परीक्षेत विशेष गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी पारंभी संस्थेचे संस्थापक आबासाहेब काकडे व स्व. निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. एसएससी परीक्षेत ८५ टक्क्या पेक्षा अधिक गुण मिळवून विद्यालयात अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतिय आलेल्या विद्यार्थीनी भक्ती केदार, आरती दहिफळे व दिव्या पालवे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उबाळे यांनी या गुणवंतानी भविष्यात उत्तम यश संपादन करून विद्यालयाचा व आपल्या गावाचा लौकिक वाढवावा. अशा अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. माणिक केदार, राजेंद्र दहिफळे अंबादास पालवे, संत सेवालाल प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के सर्व शिक्षक व सेवकवृंद उपस्थित होता. सुखदेव गावडे यांनी सुत्र संचलन करू आभार मानले.